मुंबई ;- विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेच्या सभागृहात भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी याची घोषणा केली. त्यानंतर विरोधकांनी सभागृहात गोंधळ करत राज्य शासन आणि सभापती विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या वक्तव्यावर भारतीय जनता पार्टीचे आमदार आक्रमक झाले होते. भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच यासाठी आमदार प्रसाद लाड यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं होतं. त्यानंतर विधानपरिषदेमध्येही सत्ताधाऱ्यांनी आक्रमक होत अंबादास दानवे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी काही वेळासाठी कामकाज स्थगित केले होते. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरु झाले.