असहाय वृद्ध महिलेला शासनाकडून मदतीचे अपेक्षा
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तालुक्यातील लोण खुर्द येथे अतिवृष्टीने कमलबाई शांताराम पाटील यांच्या मालकीच्या घराची भिंत कोसळली. त्यामुळे सदर वृद्ध महिला व कुटुंबीय बेघर झाले आहेत. महिलेला शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
यंदा पावसाळा सरासरीपेक्षा जास्त होत आहे. घर पडून नुकसान झालेली महिलेला अशिक्षित असल्याने ६५ वर्षे वय असूनही वर्षानुवर्ष प्रतीक्षा करुन ग्रामपंचायतीकडून अद्याप घरकुल प्राप्त नाही. अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीत जाऊन विनंती करून अखेर कमलबाई थकली पण घरकुल काही मिळाले नाही.
आता ज्या घरात कमलबाई पाटील राहतात त्या घराची भिंत रात्री पडली. त्यानंतर तलाठी पवार यांनी पंचनामा केला आहे. हातावर पोट असणाऱ्या कमलबाई आता पंचनाम्याच्या आणि शासकीय मदतीच्या आशेवर असून त्यांना शासन स्तरावरुन लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी पोलीस पाटील व ग्रामस्थ यांनी केली आहे.