जळगाव (प्रतिनिधी) : राज्यातील १ हजार ६१ पोलीस अंमलदारांना नि:शस्त्र पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतचे आदेश मंगळवारी २० ऑक्टोबर रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) राजेश प्रधान यांनी काढले आहेत. त्यात जळगाव जिल्ह्यातील २५ अंमलदारांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील २५ अमलदारांत राजेंद्र दामू बोरसे, मगन पुंडलिक बोरसे, चंद्रसिंग गुलाबसिंग पाटील, नरसिंह ताराचंद वाघ, मोहन गिरधर लोखंडे, गंभीर आनंदा शिंदे, शेख मकसूद शेख बशीर, इरफान काझी, सुनील शामकांत पाटील, मसलोद्दीन शेख, चंद्रकांत भगवान पाटील, अरुण आनंदा सोनार, राजेंद्र भास्कर साळुंखे, किशोर रामेश्वर पाटील, चंद्रकांत बुधा पाटील, राजाराम धर्मा भोई, अंबादास नारायण पाथरवट, गोकुळसिंग नगिनसिंग बयास, राजू दशरथ मोरे, सुनील जगन्नाथ वाणी, रवींद्र मानसिंग गिरासे, रामकृष्ण पंढरीनाथ पाटील, कल्याण नाना कासार, प्रदीप पंढरीनाथ चांदेलकर, काशिनाथ श्रावण कोळंबे यांचा समावेश आहे.







