जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग येथील कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभागातर्फे ‘अलुम्नी सिरीज २०२५’ अंतर्गत प्रतिबंधात्मक मार्ग: समुदाय सहभागातून आरोग्यदायी जीवननिर्मिती या महत्त्वपूर्ण विषयावर विशेष ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी श्री संभाजी कॉलेज ऑफ नर्सिंग, नांदेड येथील सह प्रा. लीना शिंगरे या मुख्य वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी समुदाय सहभागाचे महत्त्व, आरोग्यविषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि लोकसहभागातून आरोग्यदायी समाजनिर्मितीचे विविध पैलू विद्यार्थ्यांसमोर मांडले.कार्यक्रमाचे कन्व्हेनर मिस्टर निर्भय मोहोड (असोसिएट प्रोफेसर व विभागप्रमुख, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग) यांनी कार्यक्रमाचे नियोजन, समन्वय आणि मार्गदर्शन प्रभावीपणे सांभाळले. झूम मीटिंगद्वारे पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना वक्त्यांनी सविस्तर उत्तरे देत समुदाय आरोग्य व्यवस्थेतील आधुनिक संकल्पना स्पष्ट केल्या.कार्यक्रमास प्रिन्सिपल विशाखा गणवीर, उपप्राचार्या जेसिंथ धाया तसेच प्रा.स्वाती गाडेगोणे, प्रा.दिवायना पवार,प्रा. आश्लेषा मून, प्रा. सुमित भरंबे आणि मिस्टर सचिन पवार यांची उपस्थिती लाभली.विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त, माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी ठरलेल्या या व्याख्यानामुळे समुदाय आरोग्यविषयक ज्ञान वृद्धिंगत होण्यास मोठी मदत झाल्याचे मत सहभागींकडून व्यक्त करण्यात आले.










