चोपडा ( प्रतिनिधी ) – चोपडा तालुक्यात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तरूणाला अटक करण्यात आली आहे.
चोपडा तालुक्यात १४ वर्षीय मुलगी कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ती आठवीचे शिक्षण घेत आहे. गुरूवारी दुपारी अल्पवयीन मुलगी घरी एकटी असतांना गावातील संशयित आरोपी धीरज रविंद्र फुगारे (वय-१८) हा घरात आला. मला फोन का लावत नाही असे म्हणून पहिल्यांदा मुलीचा विनयभंग केला. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. पिडीत अल्पवयीन मुलीने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर अडावद पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडीत मुलीच्या फिर्यादीवरून अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस पोउनि चंद्रकांत पाटील करीत आहेत.