पुणे ( प्रतिनिधी ) – शहरातील वडगाव शेरी परिसरात १६ वर्षीय मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवून गर्भपात केल्याची घटना समोर आली यातील प्रियकर व साथीदारासह गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित मुलीचे व आरोपीचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. प्रियकर आरोपी अमित याने तिला गर्भवती केले होते. त्यामुळे गर्भपात करावा लागला होता. आरोपी प्रियकराचा मित्र धनंजय रोकडे यानेही पिडीतेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याचा व्हिडीओ प्रियकराने त्याच्या मोबाईलमध्ये तयार करून , सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर मुलीने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
येरवडा पोलिसांनी आरोपी प्रियकर अमित अबदेश यादव (वय 18 रा. निरामय हॉस्पिटल जवळ, वडगावशेरी) व त्याचा साथीदार धनंजय नामदेव रोकडे (वय 38 ,रा. वडगावशेरी गावठाण) यांच्यासह गर्भपात करणारे डॉ अनिल बाळकृष्ण वरपे (वय 59, रा. वडगाव शेरी पुणे) यांना अटक केली आहे. वडगावशेरी येथील एका सोसायटीच्या शेजारील अर्धवट बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये हा गुन्हा घडला. दोन आरोपींना सहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. गर्भपात करणाऱ्या डॉक्टरलाही पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.