जळगाव शहरातून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) :- एकाच वर्गात शिकणारी अल्पवयीन मुलगी व अल्पवयीन मुलगा असे दोघे बेपत्ता झाले आहेत. जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील संत कंवरराम नगरात हा प्रकार उघडकीस आला आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी याबाबत आवाहन केले आहे.
दोन्ही मुले अल्पवयीन असल्यामुळे दोघांना पळवून नेल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गरिमा जितेंद्र तुलसी (वय सुमारे १५ वर्ष) आणि रोनक दिपक सिंग (वय सुमारे १५ वर्ष) अशी बेपत्ता अल्पवयीन मुलांची नावे आहेत. दोन्ही मुले कुणाला आढळल्यास अथवा कुणाला काही माहिती मिळाल्यास तातडीने एमआयडीसी पोलिस स्टेशनला अथवा पोलिस निरीक्षक जयपाल हिरे (८८८८८९७६८६), पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे (९०२८२२२६६६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.