चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – घराबाहेर खेळायला जातो म्हणून गेलेल्या १४ वर्षीय मुलास अज्ञाताने पळविल्याची धक्कादायक माहिती समोर आली. चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
चाळीसगाव शहरातील हूडको कॉलनीत शेख साखीर शेख कासम परिवारासह वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा अय्यान उर्फ सोनू शेख साखीर (वय-१४) हा सोमवारी सायंकाळी घरच्यांना बाहेर खेळायला जातो म्हणून सांगून गेला. मात्र तो घरीच न परतल्यामुळे घरच्यांनी परिसरासह नातेवाईकांकडे शोधाशोध केली. परंतु अय्यान उर्फ सोनू शेख सापडला नाही.
अज्ञात इसमाने मुलाला फुस लावून पळविले आहे. याची खात्री झाल्यानंतर शेख साखीर शेख कासम यांनी चाळीसगाव शहर पोलिस ठाणे गाठून भादवी कलम- ३६३ प्रमाणे अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि बिरारी हे करीत आहेत.