मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – मुक्ताईनगर तालुक्यातील हिवरा येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील हिवरा येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या पालकांसह राहते. ८ जुलै रोजी दुपारी १२ वाजता गावातील संशयित आरोपी निजाम गुलजार तडवी, रा. हिवरा, ता. मुक्ताईनगर याने मुलीला १० रूपयाचे आमिष दाखल ग्रामपंचायत कार्यालयात घेवून अश्लिल वर्तन करून मुलीचा विनयभंग केला. पिडीत मुलीने हा प्रकार वडीलांना सांगितला. पिडीत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी निजाम तडवी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक तडवी करीत आहे.