यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील घटना
यावल (प्रतिनिधी) – तालुक्यातील डांभूर्णी गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. गावातील गावठाण जागेवर असलेल्या आदिवासी वस्तीत ही घटना घडली. यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
मुकेश नरसिंग बारेला (१७, रा. डांभुर्णी ता. यावल) असे मयत तरुणांचे नाव आहे. तो गावात परिवारासह राहतो. गावठाण जागेवर आदिवासी वस्ती असून या वस्तीतील त्याच्या घरी असताना गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना निदर्शनास येताच स्थानिक ग्रामस्थांनी वस्तीवर धाव घेतली व मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणला. वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवदास चव्हाण यांनी तपासणी करून मृत घोषीत केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुल करीत आहे.