नागपूर ( वृत्तसंस्था) – महिलांवरील अत्याचाराच्य़ा घटनांमध्ये वाढ झाली आहे. दररोजच नवनवीन प्रकरणं समोर येत आहेत. त्यातच आता नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली असून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यामुळे एकाला आपला जीव गमवावा लागला आहे.
अल्पवयीन मुलीवर बळजबरी अनैतिक संबंध ठेवत तिच्या कुटुंबीयांना ब्लॅकमेल करण्यात आले. या प्रकरणाची पीडित मुलीच्या भावाला माहिती मिळताच त्याने आरोपी तरुणाचा काटा काढला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोन आरोपींना अटक केली. आरोपी अय्याज सिद्दीकी याने पीडित मुलीचा लपून आंघोळ करतानाचा व्हिडीओ शूट केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत तो अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करत होता.
दरम्यान याची माहिती पीडित मुलीच्या भावाला लागली. यामुळे संतप्त झालेल्या भावाने आरोपी अय्याज सिद्धीकी याचा काटा काढला. पीडितेच्या भावाने आणखी एकाला सोबत घेऊन अय्याजचा चाकूने वार करून खून केला. तसेच मृतदेह कपड्यात गुंडाळून झुडपात फेकून दिला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली.