• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अल्पवयीन मुलगी लैंगिक अत्याचार केल्याने झाली गर्भवती, तरुणाला १० वर्षे शिक्षा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 18, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश

जळगाव न्यायालयाचा निर्णय  

जळगाव (प्रतिनिधी) : अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या अरुण भगवान गवळी (रा. गुम्मी, जि. बुलढाणा) याला न्या. एस. आर. भांगडिया-झवर यांनी शुक्रवारी १० वर्षांची सक्त मजुरी व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

शिरपूर तालुक्यातील १४ वर्षीय मुलगी पाचोरा तालुक्यात तिच्या आजोबांकडे शिक्षणासाठी राहत होती. इयत्ता नववीमध्ये असताना २४ डिसेंबर २०१६ रोजी शाळेची वेळ संपल्यावरही ती घरी आली नव्हती. त्यामुळे तिच्या आजोबांनी तक्रार दिली होती. याचा तपास सुरू असताना याच दिवशी अरुण भगवान गवळी याने तिला रेल्वेने जळगाव येथे बोलावले व तिला घेवून त्याच्या बहीणीकडे गेला होता. रात्रभर तेथे थांबल्यानंतर गवळी याने मुलीला त्याच्या गावी व नंतर छत्रपती संभाजीनगर येथे घेवून गेला. तेथे मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत वारंवार तिच्याशी शारिरीक संबंध केले, त्यामुळे मुलगी गर्भवती झाली.

मुलगी गर्भवती राहिल्याविषयी गवळी याने या मुलीच्या आईला कळविले. त्यानंतर आई व इतर जण मुलीला घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे जात असतानाच ते आपल्याला मारतील या भितीने गवळी हा मुलीसह बेगमपुरा पोलिस ठाण्यात हजर झाला. तेथून पाचोरा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान मुलगी सहा आठवड्याची गर्भवती असल्याचे समोर आले. तसा वैद्यकीय पुरावा न्यायालयासमोर सादर करण्यात आला. डॉ. प्रवीण ठाकरे यांच्यासह पीडितेची मैत्रीण, पीडितेची मामी यांच्या साक्ष महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकारपक्षातर्फे १० साक्षीदार तपासण्यात आले. युक्तिवाद पूर्ण होऊन न्या. एस. आर. भांगडिया- झवर यांनी अरुण गवळी यास भादंवि कलम ३७६ नुसार १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व २० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास, भादंवि कलम ३६३ नुसार दोन वर्षे सक्त मजुरी, एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास आठ दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

बेपत्ता तरूणाचा मृतदेह आढळला विहिरीत

Next Post

बामोशी बाबांच्या यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या मालेगावच्या तिघांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अट्टल चोरट्यास शिताफीने अटक ; अनेक चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता

बामोशी बाबांच्या यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या मालेगावच्या तिघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon