पारोळा तालुक्यातील घटना
पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीस मध्यरात्रीच्या सुमारास गावातील तीन संशयितांनी पळवून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत पारोळा पोलिसांत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही अल्पवयीन मुलगी १७ वर्षांची असून, ती बुधवारी रात्री परिवारासह जेवण करून घरात झोपली होती. पहाटे आई-वडिलांनी बघितले असता मुलगी घरात नव्हती. शोधाशोध करूनही ती सापडली नाही. अधिक शोध घेतला असता विनोद संजय गायकवाड, शिवदास पोपट मोरे, वैजनाथ संजय गायकवाड या संशयितानी अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना घडल्याचे दिसून आले.
याबाबत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारोळा पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारोळा पोलीस पुढील तपास करीत असून तिघा संशयित आरोपींचा शोध घेत आहे.