प्रभाग १९ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; परिवर्तनाचा नागरिकांचा निर्धार
जळगाव (विशेष प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग १९ ‘क’ मध्ये परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या अधिकृत उमेदवार अलका राजेंद्र सपकाळ (देशमुख) यांनी आपल्या समाजकार्याच्या जोरावर प्रचारात मोठी आघाडी घेतली असून, “तुतारी वाजवणारा माणूस” हे चिन्ह आता घरोघरी पोहोचले आहे. त्यांच्यासह त्यांचे चिरंजीव विशाल देशमुख यांच्याकडे समाजकार्याचा भक्कम वारसा आणि जनसंपर्काचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे.


अलका सपकाळ (देशमुख) आणि विशाल देशमुख हे एक सक्रिय सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. अलका सपकाळ (देशमुख) यांच्या कार्याचा आवाका मोठा असून त्या विविध संस्थांच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नांसाठी लढत आहेत. राजकारणात ‘फ्रेश’ उमेदवार म्हणून अलका सपकाळ (देशमुख) यांच्याकडे पाहिले जात आहे. सामान्य नागरिकांच्या समस्यांची जाण आणि त्या सोडवण्याची जिद्द यामुळे रामेश्वर कॉलनीतील नागरिकांचा कल विशाल देशमुख यांच्या मातोश्री अलका सपकाळ (देशमुख) झुकला आहे. महिला मतदारांमध्ये त्यांची लोकप्रियता विशेषत्वाने दिसून येत आहे.
अलका सपकाळ देशमुख यांचे समाजकार्य
१) विचार वारसा फाउंडेशन: महिला शाखेच्या अध्यक्षा म्हणून महिला सक्षमीकरणासाठी काम.
२) जगद्गुरू महिला बचत गट: अध्यक्षा म्हणून शेकडो महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवले.
३) नवदुर्गा महिला मंडळ (रामेश्वर कॉलनी): सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर.
परिवर्तनाचा निर्धार
प्रभाग १९ मध्ये सध्या “एकच संधी, विकासाची नांदी” अशा घोषणा ऐकायला मिळत आहेत. प्रस्थापित राजकारण्यांना धडा शिकवण्यासाठी आणि रामेश्वर कॉलनीचा रखडलेला विकास मार्गी लावण्यासाठी अलका सपकाळ (देशमुख) यांना विजयी करण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे.
“प्रभागातील भगिनींना न्याय मिळवून देणे आणि रामेश्वर कॉलनीचा संपूर्ण विकास हेच माझे मुख्य ध्येय आहे. नागरिकांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”
– अलका राजेंद्र सपकाळ (देशमुख) (उमेदवार, प्रभाग १९ ‘क’)









