जळगाव ( प्रतिनिधी ) – आदिवासी कोळी महासंघाची नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी नुकत्याच झालेल्या एका बैठकींनंतर जाहीर करण्यात आली
आदिवासी कोळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व माजीमंत्री डॉ दशरथ भांडे यांच्या आदेशानुसार व राज्य कार्यकारिणी सदस्य प्रभाकर सोनवणे , उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे व राज्य समन्वयक प्रशांत तराळे यांच्या मार्गदर्शनाने या कार्यकारिणीची निवड करण्यात आली .
नंदुरबार जिल्हा अध्यक्ष भाऊराव बागुल यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार जिल्हा कार्यकर्त्यांची बैठक प्रजासत्ताकदिनी शहादा येथे झाली यावेळी नंदुरबार जिल्हा कार्यकारिणीची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली
यावेळी बैठकीत उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांनी सांगितले की नंदुरबार जिल्हा आदिवासी जमातीचा बालेकिल्ला आहे जात प्रमाणपत्र संदर्भात संघर्ष करावा लागतो आहे यापुढे आदिवासी कोळी महासंघाच्या माध्यमातून आदिवासी कोळी बांधवांना एकसंघ करून समाजाला सरसकट टोकरे कोळी जातीचे प्रमाणपत्र देण्यात येईल असे आश्वासन दिले
यावेळी सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा जिल्हा अध्यक्ष भाऊराव बागुल यांनी सांगितले की महाराष्ट्रासह जळगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील आदिवासी कोळी बांधवांना त्यांचे आरक्षण , हक्क , अनुसूचित जाती प्रमाणपत्र मिळावे यासाठी कायदेशीर पाठपुरावा करत आहेत सर्व प्रांत कार्यालयावर धडक देऊन जात प्रमाणपत्र संदर्भात अडचणी बाबत कार्य करीत आहोत नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ दशरथ भांडे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.