अमळनेर येथे पार पडला कार्यक्रम
जळगाव (प्रतिनिधी) :- अमळनेर येथील प्रताप मिल कंपाउंड मधील आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथे होत आहे. यावेळी व्यासपीठावर मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, माजी आमदार स्मिता वाघ, डॉ. बी. एस. पाटील, शिरीष चौधरी, मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेरचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी, खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष प्रदीप अग्रवाल, बोधचिन्ह निर्माते प्राचार्य मिलिंद भामरे आदी उपस्थित होते.
मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणाले की, बोधचिन्हाची निर्मिती येथील भूमीपुत्राने केली याचा अभिमान आहे. अतिशय उत्कृष्ट बोधचिन्ह तयार केले. बोधचिन्हाच्या माध्यमातून जगाच्या व्यासपीठावर खान्देशची प्रतिमा उमटवली आहे. अमळनेर सारख्या छोट्या गावात १९५२ साली साहित्य संमेलन झाले. प्रताप कॉलेज, प्रताप शेटजींनी पूर्वजांनी तत्वज्ञान मंदिराच्या माध्यमातून जगात प्रसिद्ध आहे. सानेगुरुजींची चळवळ येथून झाली याचा सर्व अभ्यास करून येथे साहित्य संमेलनसाठी परवानगी दिली. महाराष्ट्राला दिशा देणारे साहित्य संमेलन येथे होईल. असा विश्वास व्यक्त करत साहित्य संमेलन प्रत्येकाने यशस्वी करून दाखवावे. अशी अपेक्षाही पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
बोधचिन्हाचे उद्घाटक कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी म्हणाले की, तब्बल ७२ वर्षानंतर अमळनेर येथे होणारे साहित्य संमेलन आत्मीयतेचा विषय आहे. अमळनेर सांस्कृतिक राजधानी आहे. शैक्षणिक क्षेत्रात मराठी भाषेचा अपेक्षित वापर होत नाही, यासाठी आपल्याला मानसिकता बदलण्याची गरज आहे. मातृभाषा हिच शिक्षणाची भाषा असेल तर विद्यार्थ्यांचे जीवन समृध्द होते, असा निष्कर्ष एका संशोधनातून समोर आला असल्याचेही कुलगुरुंनी नमूद केले. प्रास्ताविक करतांना मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी संमेलनाविषयी सविस्तर माहिती दिली. बोधचिन्ह साकारणारे प्राचार्य मिलिंद भामरे यांनी बोधचिन्हाबाबत थोडक्यात माहिती दिली. मी अमळनेरचा आहे. माझ्याकडून परमेश्वराने ही सेवा करून घेतली असे सांगितले. सूत्रसंचालन शरद सोनवणे व आभार नरेंद्र निकुंभ यांनी मानले.
याप्रसंगी नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, शामकांत भदाणे, रमेश पवार, सोमनाथ ब्रम्हे, प्रदीप साळवी, पी.बी.भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, शाम पवार, शिला पाटील, रजनीताई केले, साहित्यिक कृष्णा पाटील, शरद धनगर, रेखा पाटील, सुनिता पाटील, सुभाष पाटील घोडगावकर, हिरामण कंखरे, शाम अहिरे, मनोज पाटील, गोकुळ बोरसे, भागवत सूर्यवंशी, सुलोचना वाघ, नयना पाटील, माधुरी पाटील, विनोद पाटील, प्रदीप अग्रवाल, विद्या हजारे, डॉ.रामलाल पाटील, पूनम साळुंखे, डॉ.चंद्रकांत पाटील, हरि भिका वाणी, बजरंग अग्रवाल, नीरज अग्रवाल आदी उपस्थित होते.
संमेलनाचे बोधचिन्ह साकारण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली होती. यात प्राचार्य मिलिंद भामरे यांनी साकारलेल्या बोधचिन्हाची सर्वानुमते निवड करण्यात आली. या बोधचिन्हात जळगावसह संपूर्ण खान्देशातील संस्कृतीचं दर्शन घडविण्यात आलं आहे. बोधचिन्हात लेखणी, केळीची पानं, मराठीचा म, बहिणाबाईंचा जातं, ग्रामीण भागाचं वाद्य संबंळ, आदिवासी वाद्य तरपा, माता सरस्वतीचे बोधचिन्ह, सखाराम महाराज मंदिर मंगळग्रह मंदिराच्या प्रतिमेचा समावेश करण्यात आला आहे. तसेच चिन्हाखाली ‘बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो’ या ओळी लिहिल्या आहेत.
On Mon, Oct 2, 2023 at 8:26 PM केसरीराज Live <bhagavansonar@gmail.com> wrote:
>
> *सविस्तर वाचा* 👇
>
>
> ——————————
> *ताज्या घडामोडी पहाण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा*
>
> https://chat.whatsapp.com/F6Pa1xViBThEy3l5onR23G
>
> *आमच्या टेलिग्राम ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा*
>
> https://t.me/+QCHTKdr8yM0xODk1
>
> ========================
>
> *फैजपूर येथे शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष उभारणी प्रात्यक्षिक*
>
> *सविस्तर वाचा* 👇
>
> https://kesariraj.com/faizpur-yethe-shunya-urjevar/
> ——————————
> *ताज्या घडामोडी पहाण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा*
>
> https://chat.whatsapp.com/F6Pa1xViBThEy3l5onR23G
>
> *आमच्या टेलिग्राम ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा*
>
> https://t.me/+QCHTKdr8yM0xODk1
>
>
> फैजपूर (प्रतिनिधी ) – महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत
> डॉ.उल्हास पाटील कृषी महािद्यालय जळगाव येथील कृषीकन्या यांच्या ग्रामीण
> कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत फैजपूर गावात कृषी कन्या वैशाली रोडे,
> सुजाता खरात, वैष्णवी गुंजकर, सुप्रिया बडे यांनी शून्य ऊर्जेवर आधारित
> शीतकक्षाची उभारणी केली. शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्षाची उभारणी कमी
> खर्चात आणि सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंचा वापर करून करता येते. या
> शीतकक्षाचा वापर फळांचा साठवण कालावधी वाढविण्यासाठी करता येतो. फळांची
> साठवण कमी तापमान आणि योग्य आर्द्रतेमध्ये केल्यास त्यांचा साठवण कालावधी
> वाढविणे शक्य आहे. शीतकक्षातील साठवणुकीमुळे फळे जास्त काळ टिकतात.
> त्यामुळे फळांची होणारी नासाडी टाळता येते.
>
> =====================
>
> *हृदयद्रावक ! खदानीत बुडून आईसमोरच तीन वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू*
>
> *एरंडोल तालुक्यातील सावदे येथील घटना*
>
> *सविस्तर वाचा* 👇
>
> https://kesariraj.com/khadanit-budun-balkacha-mrutu/
> ——————————
> *ताज्या घडामोडी पहाण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा*
>
> https://chat.whatsapp.com/F6Pa1xViBThEy3l5onR23G
>
> *आमच्या टेलिग्राम ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा*
>
> https://t.me/+QCHTKdr8yM0xODk1
>
>
> जळगाव (प्रतिनिधी) – आई सोबत खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन
> वर्षीय चिमुकल्याचा खेळत असताना पाय घसरल्याने खदानीत पाण्यात बुडून
> मृत्यू झाल्याची दुदैवी घटना सोमवारी २ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या
> सुमारास एरंडोल तालुक्यातील सावदे गावात घडली आहे. त्याचा मृतदेह जळगाव
> येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणला असता नातेवाईकांनी एकाच आक्रोश
> केला. पाळधी पोलीस दुरक्षेत्रात घडण्याची नोंद करण्याचे काम सुरू होते.
>
> रोहित विकास पठाण (भिल,वय-३, रा. सावदे ता.एरंडोल) असे मयत झालेल्या
> चिमुकल्याचे नाव आहे. त्याचे वडील विकास सुपडू पठाण हे पत्नी मोनी व ३
> वर्षाचा मुलगा रोहित यांच्यासह राहतात. रोहित हा गावातील बालवाडी येथे
> शिकण्यास जात असतो. नेहमीप्रमाणे सोमवारी २ ऑक्टोबर रोजी सकाळी पठाण हे
> शेताच्या कामाला निघून गेले होते. दरम्यान दुपारी १२ वाजेच्या सुमारास
> रोहित हा त्याची आई मोनीबाई तिच्यासोबत खदानीवर कपडे धुण्यासाठी गेला
> होता तेथे खेळत असताना अचानक त्याचा पाय घसरला व तो पाण्यात पडला.
>
> गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून काही पोहणाऱ्यांनी त्याला
> बाहेर काढून तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल
> केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.आदित्य साळुंके यांनी त्याला मयत घोषीत
> केले. याबाबत पाळधी पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरू होते. रोहित
> हा एकुलता एक मुलगा असल्याने नातेवाईकांनी एकाच आक्रोश केला होता.
>
> त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.
>
> या ठिकाणी रोहित पठाण राहत होता.
>
> ======================
>
> *सुसंवादातुनच समाज घडतो – अनुराधा शंकर*
>
> *गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे अहिंसा सदभावना यात्रेद्वारे विश्व अहिंसा दिवस साजरा*
>
> *सविस्तर वाचा* 👇
>
> https://kesariraj.com/susavadatunch-samaj-ghadto/
> ——————————
> *ताज्या घडामोडी पहाण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा*
>
> https://chat.whatsapp.com/F6Pa1xViBThEy3l5onR23G
>
> *आमच्या टेलिग्राम ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा*
>
> https://t.me/+QCHTKdr8yM0xODk1
>
>
> जळगाव ( प्रतिनिधी ) – लहान मुलं हे देशाचे भविष्य आहे. मुलांनी
> जिज्ञासा पुर्वक प्रश्न विचारून सुसंवाद घडवावा, त्यातुनच समाज घडेल. असे
> प्रतिपादन मध्यप्रदेशच्या पोलीस महासंचालक (DGP) श्रीमती अनुराधा शंकर
> यांनी केले. त्या गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजित अहिंसा सद्भावना
> शांती यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत
> होत्या.
>
> महात्मा गांधीजींच्या १५५ व्या व लाल बहादूर शास्त्रीजींच्या १२० वी
> जयंती निमित्त लालबहादूर शास्त्रीजींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून
> अहिंसा सद्भावना शांती यात्रेची सुरवात झाली. यावेळी प्रमुख अतिथी
> मध्यप्रदेशच्या पोलीस महासंचालक (DGP) श्रीमती अनुराधा शंकर यांच्याहस्ते
> अहिंसा सदभावना यात्रेला हिरवी झेंडी दाखवण्यात आली. यावेळी
> जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जळगाव मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड,
> बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एन.
> माहेश्वरी, गांधीजींचे पणतु तुषार गांधी, डॉ. सुदर्शन अय्यंगार, अशोक
> जैन, अनिल जैन, आमदार सुरेश भोळे, आमदार लता सोनवणे, भरत अमळकर, माजी
> महापौर जयश्री महाजन, विष्णू भंगाळे, राधेश्याम चौधरी, अँड.
> रविंद्रभैय्या पाटील, अथांग जैन, सुरेश जैन, अब्दुल भाई, सौ. ज्योती जैन,
> सौ. निशा जैन, सौ. अंबिका जैन आदींसह शहरातील प्रशासकीय अधिकारी, जैन
> इरिगेशन मधील सहकारी, नागरीक व शहरातील हरिजन सेवक संघ कन्या छात्रालय,
> शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालय, नंदनीबाई माध्यमिक विद्यालय, ओरियन
> इंग्लिश मिडीअम स्कूल, अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल प्रायमरी, अनुभूती
> इंग्लिश मिडीअम स्कूल सेकंडरी, अनुभूती निवासी स्कूल, आदर्श सिंधी
> हायस्कूल, मनपा उर्दू माध्यमिक विद्यालय या शाळेच्या विद्यार्थ्यांनी
> मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
>
> यात्रेत भारत माता, महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब
> आंबेडकर, कस्तुरबा गांधी, सरोजनी नायडू, अब्दुल कलाम यांची वेशषभूषा
> असलेली चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधुन घेतले. ‘जय जवान जय किसान’,
> ‘महात्मा गांधीजी की जय’ चा नारा देत लाल बहादूर शास्त्री टॉवरपासून
> शांती यात्रा निघून सरदार वल्लभभाई पटेल मनपा इमारत, पंडीत जवाहरलाल
> नेहरू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-डॉ. हेडगेवार चौक, नवीन
> बसस्टॅण्ड मार्गे महात्मा गांधी उद्यानात यात्रेचे समारंभात रूपांतर
> झाले.
>
> श्रीमती अनुराधा शंकर यांनी आपल्या भाषणात मुलांशी संवाद साधताना
> गांधीजींविषयी रंजक गोष्टी सांगितल्या. महात्मा गांधीजींच्या विचारांची
> आवश्यकता विद्यार्थ्यांना आहे. कारण हेच मुलं भविष्यात समाज घडवतील.
> प्रश्न विचारु न देणाऱ्यांशी मैत्री करू नये. सर्वधर्म प्रार्थना आपण
> म्हणतो पण एकमेकांशी त्या प्रार्थनेप्रमाणे आचरण करतो का? हे स्वतः ला
> समजले पाहिजे. आपण लालबहादुर शास्त्री, महात्मा गांधीजी यांचे बुध्दी,
> युक्ती व शक्ती हे गुण आत्मसात करावे असेही त्या म्हणाल्यात.
>
> लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व पुर्ष्पापण
> मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सर्वधर्म प्रार्थना होऊन ॲड. अच्युतराव
> अत्रे इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘वैष्णव जन तो…’ भजन
> गायन केले. प्रास्तविकेत गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे गतवर्षातील
> उपक्रमांविषयी सौ.अंबिका जैन यांनी माहिती दिली. नॅशनल लिडरशिप कॅम्पमधील
> प्रतिनिधीं समवेत गांधीजींचे पणतु तुषार गांधी यांनी अहिंसेची शपथ दिली.
> पी. जी. डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात पदव्या
> प्रदान केल्या गेल्या.
>
> डॉ. विश्वास पाटील लिखीत ‘खानदेश में महात्मा गांधी’ या पुस्तकाचे
> प्रकाशन झाले. त्यात महात्मा गांधीजींविषयी कान्हदेशातील अनेक घटनांची
> नोंद ऐतिहासिक पुस्तकात आहे त्याविषयी त्यांनी मनोगत व्यक्त केले.
> यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तुषार गांधी होते. आ.
> सुरेश भोळे, आ. लता सोनवणे, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, जैन इरिगेशनचे
> अध्यक्ष व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक अशोक जैन, अनिल जैन, डॉ.
> सुदर्शन आयंगार, सौ. ज्योती जैन, भरत अमळकर, डॉ. विश्वास पाटील,
> फाऊंडेशनच्या रिसर्च डिन गीता धरमपाल, सौ. अंबिका जैन आदी मान्यवर
> उपस्थित होते.
>
> दीपक चांदोरकर यांनी शेवटी राष्ट्रगीत म्हटले. सुत्रसंचालन डॉ. अश्विन
> झाला यांनी केले. याच कार्यक्रमात गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित
> राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल ही घोषित करण्यात आला. यात
> २१ जिल्ह्यातील १४५ स्पर्धक सहभागी झाले होते.
>
> पहिला गट १ पुरस्कार विजेते.- मानसी गाडे- प्रथम, (शेवगाव, जि. नगर),
> गुंजन अहिरराव-द्वितीय, (धाडणे, जि. धुळे) हंसिका महाले, – तृतीय
> (भुसावल) तर उत्तेजनार्थ नेहा पाटील, (नंदुरबार), धनश्री पाटील,
> (तारखेडा, ता. पाचोरा जि. जळगाव)
>
> दुसऱ्या गटातील विजेते स्पर्धक- सृष्टी थोरात- प्रथम, (नंदुरबार),
> सृष्टी कुलकर्णी – द्वितीय (जळगाव), पियुष अहिरराव- तृतीय, (धाडणे, ता.
> साक्री जि. धुले) उत्तेजनार्थ पारितोषिक प्रणाली पाटील, (तारखेडा ता
> पाचोरा), पीयुष अहिरराव हे विजेते ठरले. त्यांना मान्यवराच्याहस्ते
> पारितोषिक, प्रमाणपत्र देऊन गौरविले गेले.
>
> चरखा जयंती निमित्त अखंड सूत कताई
> महात्मा गांधींनी चरखा हे राजकीय मुक्तीसाठी एक महत्त्वाचे साधन म्हणून
> वापरून, ‘प्राचीन कार्य नीतिमत्तेचे’ रूपक म्हणून आणि ब्रिटिश राजवटीला
> आर्थिक आणि सामाजिक प्रतिक्रियेचे प्रतीक म्हणून वापरले. महात्मा
> गांधींनी त्यांचा जन्मदिन चरखा जयंती म्हणून साजरा करण्यात यावा असे
> आवाहन केले होते. त्याचे औचित्यासाधून बैलगाडीवर चरखाची मिरवणूकही यावेळी
> काढण्यात आली होती. तसेच कार्यक्रमस्थळी फाऊंडेशनचे काही सहकारी पुर्णवेळ
> सुतकताई करत होते. चरखा जयंती निमित्ताने गांधी तीर्थ येथे आज दिवसभर
> अखंड सूत कताई करण्यात आली.
>
> ========================
>
> *गांधीतीर्थ देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेतून महात्मा गांधीजींना आदरांजली*
>
> *ओरियन सीबीएससी इंग्लिश मीडियम प्रथम*
>
> *सविस्तर वाचा* 👇
>
> https://kesariraj.com/bhaktipar-samuhgit-gayan-spardha/
> ——————————
> *ताज्या घडामोडी पहाण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा*
>
> https://chat.whatsapp.com/F6Pa1xViBThEy3l5onR23G
>
> *आमच्या टेलिग्राम ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा*
>
> https://t.me/+QCHTKdr8yM0xODk1
>
>
> जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील गांधी रिसर्च फाउंडेशनच्यावतीने विश्व
> अहिंसा दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी गांधीतीर्थ देशभक्तीपर
> समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन केले होते. कांताई सभागृह येथे झालेल्या
> स्पर्धेत सहभागी जळगाव शहरासह तालुक्यातील १७ शाळांनी सहभाग नोंदविला. या
> स्पर्धेत ओरियन सीबीएससी इंग्लिश मीडियम स्कूल ने प्रथम क्रमांक
> पटकाविला.
>
> स्पर्धेत सहभागी शाळांनी मराठी व हिंदी भाषेतील देशभक्तीपर गीत सादर
> केले. सहभागी संघातील विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र व विजेत्या
> संघांना अनुक्रमे रु. ११ हजार, ७ हजार, ५ हजार व उत्तेजनार्थ रु. २
> हजाराची तीन रोख पारितोषिके देण्यात आले.
>
> स्पर्धेचा निकाल
>
> ओरियन सीबीएससी इंग्लिश मीडियम स्कूल (प्रथम), ए. टी. झांबरे विद्यालय
> (द्वितीय), विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल (तृतीय) क्रमांक
> तर उत्तेजनार्थ श्रीमती ब. गो शानबाग विद्यालय सावखेडा, अनुभूती इंग्लिश
> मीडियम सेकंडरी स्कूल, बाल विश्व इंग्लिश व सेमी इंग्लिश माध्यम शाळा
> दादावाडी क्रमांकाने पारितोषिक मिळाले.
> ज्येष्ठ गांधीयन अब्दुल भाई यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या स्कूलच्या
> संघांना पारितोषिक वितरण करण्यात आले. चषक, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक
> असे स्वरूप होते. परीक्षक म्हणून दीपक चांदोरकर, संपदा छापेकर, आदिती
> कुलकर्णी यांनी काम बघितले.
>
> या शाळेचा सहभाग
>
> गांधीतीर्थ देशभक्तीपर समुहगीत गायन स्पर्धेत शहरासह तालुक्यातील १५
> शाळांनी सहभाग नोंदविला यामध्ये ओरियन इंग्लिश मीडियम स्कूल, या.दे.पाटील
> माध्यमिक विद्यालय, सौ. गोटूभाऊ सोनवणे माध्यमिक विद्यालय मोहाडी,
> स्वातंत्र्यसैनिक पंढरीनाथ थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,
> मिल्लत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक
> विद्यालय शिरसोली, सौ. हिराबाई जगतराव पाटील माध्यमिक विद्यालय शिरसोली,
> कै. ॲड अच्युतराव अत्रे इंग्लिश मीडियम स्कूल, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल
> या शाळांनी ही सहभाग नोंदविला. प्रत्येक शाळेतील संघांनी देशभक्तीपर गीत
> सादर करून महात्मा गांधी यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली.
>
> सूत्रसंचालन गिरीश कुलकर्णी यांनी केले. यशस्वीतेसाठी अशोक चौधरी, सुधीर
> पाटील, विश्वजीत पाटील, चंद्रशेखर पाटील, प्रशांत सूर्यवंशी, चंद्रकांत
> चौधरी, मयूर गिरासे, विक्रम अस्वार यांच्यासह गांधी रिसर्च फाउंडेशनच्या
> सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
>
> =======================
>
> *शिरसोली येथील टॉवर वरील पावर केबल वायरची चोरी*
>
> *सविस्तर वाचा* 👇
>
> https://kesariraj.com/shirsoli-yethil-towar-kebal-chori/
> ——————————
> *ताज्या घडामोडी पहाण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा*
>
> https://chat.whatsapp.com/F6Pa1xViBThEy3l5onR23G
>
> *आमच्या टेलिग्राम ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा*
>
> https://t.me/+QCHTKdr8yM0xODk1
>
>
> जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली येथील मोबाईल टावर वरील केबल
> वायर चोरी केल्याप्रकरणी एका विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा
> दाखल करण्यात आला आहे.
>
> याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की गावात असणाऱ्या मोबाईल टावरवरील
> पावर केबल 15 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास संशयित शुभम
> रोशनलाल कुमार वैष्णवी राहणार दिल्ली मुरादाबाद हल्ली मुक्काम हॉटेल राज
> पॅलेस नवीन बस स्टॅन्ड यांनी दहा हजार रुपये किमतीची केबल चोरी केली. यात
> दहा हजार रुपये किमतीतील लाल V काळ्या रंगाची 70 एम एम व 32 एम एम जाडीची
> 21 मीटर अशी एकूण 34 हजार 300 रुपयांची केबल चोरल्याची फिर्याद रवींद्र
> अरविंद पाटील यांनी दिल्यावरून एक सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या
> सुमारास एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित
> आरोपी शुभम कुमार याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. तपास पोलीस
> हेडकॉन्स्टेबल समाधान टहाकळे करीत आहे.
>
> =====================
>
> *सरपंच पती आणि मुलाला २४ जणांकडून मारहाण*
>
> *सविस्तर वाचा* 👇
>
> https://kesariraj.com/sarpanch-pati-v-mulala/
> ——————————
> *ताज्या घडामोडी पहाण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा*
>
> https://chat.whatsapp.com/F6Pa1xViBThEy3l5onR23G
>
> *आमच्या टेलिग्राम ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा*
>
> https://t.me/+QCHTKdr8yM0xODk1
>
>
> पारोळा (प्रतिनिधी ) – सरपंच पद गेल्याच्या कारणावरून तब्बल २४ जणांनी
> महिला सरपंचाच्या पतीसह मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना २८ रोजी रात्री
> पावणे नऊ वाजेच्या सुमारास पिंप्री प्र. उ. येथे घडली असून या प्रकरणी
> पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
>
> याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की तालुक्यातील पिंप्री प्र. उ.
> येथील महिला सरपंच पुष्पा रामकृष्ण पाटील वय ४१ यांनी दिलेल्या
> तक्रारीनुसार २८ सप्टेंबर रोजी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास त्या
> घरी असताना मोठमोठ्याने आरडाओरड होत असल्याचा आवाज आल्याने त्यांनी बाहेर
> येऊन बघितले असता गावातील मारुती मंदिराच्या समोर त्यांचे पती रामकृष्ण
> गंभीर पाटील व मुलगा मयूर यांना गावातील प्लॉट भागातील संशयित आरोपी
> सुनील रामा पगारे, रामभाऊ चिंतामण भिल्ल, रणजीत मोतीलाल भिल्ल, राजू
> दादाभाऊ भिल्ल, विजय रवींद्र मालचे, राजू भिवसान भिल्ल, अजय नाना भिल्ल,
> अविनाश नाना भिल्ल गोपाल आबा भिल्ल ,अजय दिलीप गायकवाड ,रोहित सिकंदर
> भिल्ल , शैलेश भगवान पगारे ,विशाल पंडित भिल्ल, राहुल पंडित भिल्ल,
> प्रवीण पंडित भिल्ल, अनिल रणजीत भिल्ल ,भैय्या हिरामण पाटील ,संदीप महादू
> पगारे, पिंटू रोहिदास भिल्ल, खंडेराव रामभाऊ भिल्ल, शैलेश रामा पगारे
> ,अर्जुन रामा पगारे ,सचिन दयाराम पगारे ,सर्व रा. प्लॉट भाग यांनी एकत्र
> येऊन हातात लाट्या काठ्या व लोखंडी सळई आणि लोखंडी पाईपाने मारहाण करून
> शिवीगाळ करीत असल्याचा प्रकार दिसून आला.
>
> त्यावेळी पुष्पा पाटील यांनी धाव घेऊन त्या ठिकाणी सुनील रामा पगारे हा
> त्यांच्या पती व मुलाला मारहाण करून तुमच्यामुळे आमचे सरपंच पद गेले
> असून आम्ही तुम्हाला जिवंत सोडणार नाही असे सांगत आज तुमचा काटा काढून
> टाकू असे बोलून लोखंडी पाईपने मुलगा मयूर याला तर पती यांच्या डोक्यावर
> आणि पोटावर मारून गंभीर दुखापत केली.
>
> तसेच पुष्पा पाटील यांनी संशयितांना आवरण्याचा प्रयत्न केले असता इतर
> काही संशयित आरोपींनी मारुती मंदिराच्या बाजूला राहणाऱ्या प्रमोद रामराव
> पाटील यांच्या घरात जबरदस्तीने घुसून प्रमोद पाटील व त्यांचा मुलगा प्रेम
> पाटील यांना घराबाहेर आणून जमिनीवर पाडून लाथा बुक्क्यांनी आणि काठीने
> मारहाण केली. यावेळी प्रमोद पाटील यांच्या पत्नी वैशाली पाटील यांची साडी
> ओढून त्यांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल अशी कृत्य केले. तसेच महिला
> सरपंचासह इतर महिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. या प्रकरणी सरपंच
> पुष्पा पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून २४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
> करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग विसाव करीत आहे.
>
> ===============================
>
> *गो. से. हायस्कूल येथील स्काऊट गाईड विभागामार्फत स्वच्छता अभियान*
>
> *सविस्तर वाचा* 👇
>
> https://kesariraj.com/go-se-haighschool-swachata/
> ——————————
> *ताज्या घडामोडी पहाण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा*
>
> https://chat.whatsapp.com/F6Pa1xViBThEy3l5onR23G
>
> *आमच्या टेलिग्राम ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा*
>
> https://t.me/+QCHTKdr8yM0xODk1
>
> पाचोरा (प्रतिनिधी) – गो.से. हायस्कूल पाचोरा येथील स्काऊट व गाईड
> विभागामार्फत १ तास स्वच्छता अभियान राबवण्यात आले. तसेच दि. २ ऑक्टोबर
> रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्रींच्या जयंतीनिमित्त या
> विभागामार्फत तंबाखू मुक्त शपथ शाळेत घेण्यात आली.
>
> याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका पी. एम. वाघ, उपमुख्याध्यापक एन. आर.
> ठाकरे, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, ए. बी. अहिरे, अंजली गोहिल तसेच स्काऊट
> प्रमुख आर बी कोळी, उज्वल पाटील, गाईड प्रमुख एस. टी. पाटील, श्रद्धा
> पवार व स्काऊट गाईडचे विद्यार्थी हजर होते.
>
> =======================
>
> *कजगावात सशस्त्र दरोडा, साडेपाच लाखांचा ऐवज लांबविला*
>
> *भडगाव तालुक्यातील खळबळजनक घटना, ३ वृद्ध नागरिक जखमी*
>
> *सविस्तर वाचा* 👇
>
> https://kesariraj.com/kajgavat-sashra-daroda/
> ——————————
> *ताज्या घडामोडी पहाण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा*
>
> https://chat.whatsapp.com/F6Pa1xViBThEy3l5onR23G
>
> *आमच्या टेलिग्राम ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा*
>
> https://t.me/+QCHTKdr8yM0xODk1
>
>
> भडगाव (प्रतिनिधी) – येथील गोंडगाव रोडवरील रहिवासी ओंकार रामदास चव्हाण
> व स्टेशन भागातील रहिवासी राजश्री नितीन देशमुख यांच्या घरावर सशस्त्र
> दरोडेखोरांनी दरोडा टाकत सोने चांदीसह रोकड असा ५ लाख ५१ हजार रुपयांचा
> ऐवज लांबविला आहे. घटनेमुळे भडगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी
> भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना सोमवारी पहाटे १
> ते अडीच दरम्यान घडलेली आहे.
>
> कजगाव येथील स्टेशन भागातील रहिवासी असलेल्या राजश्री नितीन देशमुख (वय
> ४८) ह्या घरात एकट्याच होत्या. त्यांच्या घराचा दरवाजाचा कडीकोंडा तोडत
> दरोडेखोरांनी आत प्रवेश केला. कपाटात ठेवलेले व अंगावरील सोने असे तलवार,
> लोखंडी रॉडचा धाक दाखवून महिलेस मारहाण केली. या घरात साडेसात तोळे सोने
> व एक लाख रुपये रोख दरोडेखोरांनी घेतले. नंतर तेथुन काही अंतरावर
> असलेल्या बापु खोमणे यांच्या घराचा कडीकोंडा तोडण्यासाठी प्रयत्न सुरू
> केला. मात्र बापु खोमणे यांना दरोडेखोर आले असल्याचा फोन आल्याने ते
> जागे झाले. तेव्हा दरोडेखोरांनी तेथुन पळ काढला. तेथुन काही अंतरावर
> असलेल्या कजगाव गोंडगाव मार्गावरील रहिवासी ओंकार रामदास चव्हाण यांच्या
> घराकडे मोर्चा वळविला.
>
> तेथे बाहेर झोपलेले ओंकार चव्हाण यांना या दरोडेखोरांनी जबर मारहाण करत
> घरात प्रवेश केला. एका खोलीमध्ये त्यांची पत्नी ताराबाई ओंकार चव्हाण या
> झोपलेल्या होत्या. दरोडेखोरांनी त्याच्यावर हल्ला करत तलवार रोखत
> अंगावरील चांदीचे कडे (गोट) एक किलो वजनाचे तसेच अंगावरील सोन्याची पोत,
> कानातले असं अडीच तोळे सोने लांबविले. तसेच आरती समाधान चव्हाण यांचे
> अंगावरील अडीच तोळे सोनेसह ८५ हजार रुपये रोख असा चार ते पाच लाखाचा ऐवज
> दरोडेखोरांनी लांबवला. ताराबाई चव्हाण यांच्या कानातील बाळी चक्क कानाला
> जबर दुखापत करत नेली. समाधान चव्हाण यांच्या लहान बाळाच्या गळ्यावर तलवार
> लावत दहशत निर्माण करत सारा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला, असे
> प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत.
>
> दरोडेखोरांनी ओंकार चव्हाण (वय ६८) यांना दोघ पायावर मोठ्या प्रमाणावर
> तसेच ताराबाई चव्हाण यांच्या कानास व हातावर मारून मोठी दुखापत केली तर
> समाधान चव्हाण यास देखील जबर मारहाण दरोडेखोरांनी केली. नागरिकांना
> घटनेची माहिती मिळताच त्यांची चव्हाण यांच्या घराकडे धाव घेतली. मात्र
> दरोडेखोर पसार झाले. भडगाव पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ
> गाठले. अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, डीवायएसपी अभयसिंग देशमुख, पोलीस
> निरीक्षक राजेंद्र पाटील, एपीआय चंद्रसेन पालकर, फौजदार डोमाळे, गुन्हे
> शाखेचे लक्ष्मण पाटील, कजगाव पोलीस चौकीचे नरेंद्र विसपुते यांचेसह भडगाव
> पोलीस स्टेशनचे पोलिस कर्मचारी दाखल झाले होते. तपास एपीआय चंद्रसेन
> पालकर करीत आहेत.
>
> ===================
>
> *शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महापुरुषांची जयंती उत्साहात*
>
> *सविस्तर वाचा* 👇
>
> https://kesariraj.com/shaskiy-vaidyakiy-mahavidyalay/
> ——————————
> *ताज्या घडामोडी पहाण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा*
>
> https://chat.whatsapp.com/F6Pa1xViBThEy3l5onR23G
>
> *आमच्या टेलिग्राम ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा*
>
> https://t.me/+QCHTKdr8yM0xODk1
>
>
> जळगाव (प्रतिनिधी) :- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,
> जळगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर
> शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रभारी अधिष्ठाता डॉ. किशोर
> इंगोले यांनी महापुरुषांना अभिवादन केले.
>
> यावेळी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वरिष्ठ लिपिक ज्ञानेश्वर राठोड,
> विजय बाविस्कर, मंगेश बोरसे, महेंद्र पाटील, अजय जाधव, आनंद पाटील आदी
> उपस्थित होते.
>
> =======================
>
> *वेळेत औषधं न मिळाल्यानं नवजात बालकांसह २४ तासांत २४ रुग्ण दगावले*
>
> *नांदेडच्या डॉ. चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील घटना*
>
> *सविस्तर वाचा* 👇
>
> https://kesariraj.com/velet-aoushad-n-milalyane/
> ——————————
> *ताज्या घडामोडी पहाण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा*
>
> https://chat.whatsapp.com/F6Pa1xViBThEy3l5onR23G
>
> *आमच्या टेलिग्राम ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा*
>
> https://t.me/+QCHTKdr8yM0xODk1
>
>
> नांदेड (प्रतिनिधी) :- ‘हाफकिन’ने औषधी खरेदीचा गोंधळ घातल्यानंतर
> राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधींचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे.
> त्यामुळे एक धक्कादायक प्रकार नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय
> वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घडला आहे. गेल्या २४ तासांत
> रुग्णालयात दर तासाला एक म्हणजेच २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात
> गंभीर बाब म्हणजे मृतांमध्ये १२ नवजात बालकांचा समावेश आहे. त्यामुळे
> नांदेडसह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. राज्य शासनाच्या कारभाराचे यामुळे
> वाभाडे निघत आहे. तर रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु आहे, अशी प्रतिक्रिया
> विरोधी पक्षाचे नेते देत आहेत.
>
> औषधी पुरविणारी संस्था ‘हाफकिन’ ने औषधी खरेदी करून न दिल्याने
> गोरगरिबांचा मोठा आधार असलेल्या शासकीय रुग्णालयांना औषधींचा पुरवठाच
> करण्यात आला नाही. त्यामुळे राज्यभरातील रुग्णालयांमध्ये सध्या औषधींचा
> प्रचंड तुटवडा जाणवत आहे. नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय
> महाविद्यालय व रुग्णालयाची दररोजची ओपीडी साधारणत: दोन हजारांवर आहे. या
> ठिकाणी नांदेडसह हिंगोली, परभणी, यवतमाळ, वाशिम अन् शेजारील तेलंगणा
> राज्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. रुग्णांची संख्या वाढत असताना
> औषधींच्या तुटवड्याचा विषयही गंभीर होत चालला आहे. आजही रुग्णांना
> बाहेरून औषधी आणण्याचा सल्ला दिला जातो. त्यातच गेल्या २४ तासांत
> रुग्णालयात २४ जणांचा मृत्यू झाला असून, ६ पुरुष आणि ६ स्त्रीजातीच्या
> नवजात बालकांचा समावेश आहे.
>
> रुग्णालय प्रशासन मात्र अत्यवस्थ असलेल्या अन् शेवटच्या क्षणी रेफर
> रुग्णांचा मयतामध्ये समावेश असल्याचा दावा करीत आहे; परंतु या
> प्रकारामुळे आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. जिल्हा
> नियोजन समितीकडून रुग्णालयासाठी ४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
> यातील १ कोटी रुपयात यंत्रसामग्री, १ कोटीची औषधी खरेदी, १ कोटी
> शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य आणि उर्वरित १ कोटी ऑक्सिजन फ्लँटसाठी
> ठेवण्यात आले आहेत; परंतु चार कोटींच्या प्रस्तावाला अद्याप तांत्रिक
> मान्यता मिळाली नाही. त्यामुळे १ कोटींची औषधी खरेदी रखडली आहे.
> रुग्णालयात अत्यावश्यक औषधी नसल्यामुळे शेजारील जिल्ह्याच्या रुग्णालयात
> एक्स्पायरी डेट संपत असलेल्या औषधींचा साठा गरज पडल्यास मागवून घेण्यात
> येत आहे. नेत्यांच्या वाढदिवशी औषधी भेट देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
> रुग्णालय प्रशासनाने खरेदी केलेल्या ४० लाखांच्या औषधींचा साठा संपत आला
> आहे.
>
> रुग्णालयात शेजारील चार ते पाच जिल्ह्यांतून रुग्ण येतात. अनेकजण खासगी
> रुग्णालयात उपचार घेतात. पैसे संपल्यानंतर शेवटच्या क्षणी ते शासकीय
> रुग्णालयात येतात. आलेल्या प्रत्येक रुग्णाला आम्ही दाखल करून घेतो.
> त्यामुळे मृत्यूचा आकडा मोठा दिसतो. औषधींचा तुटवडा आहे; परंतु औषधी
> नसल्याने रुग्णाचा जीव गेला असे म्हणता येणार नाही. लवकरच ‘डीपीडीसी’च्या
> निधीतून औषधी खरेदी करण्यात येणार आहे, असे अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे
> यांनी सांगितले.
>
> ======================
>
> *आयशर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात, ५ मजूर मृत्युमुखी*
>
> *बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील घटना*
>
> *सविस्तर वाचा* 👇
>
> https://kesariraj.com/malkapur-bhishan-aapghat/
> ——————————
> *ताज्या घडामोडी पहाण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा*
>
> https://chat.whatsapp.com/F6Pa1xViBThEy3l5onR23G
>
> *आमच्या टेलिग्राम ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा*
>
> https://t.me/+QCHTKdr8yM0xODk1
>
>
> मलकापूर (प्रतिनिधी) :- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील
> चौपदरीकरणाच्या कामाकरिता असलेल्या रस्त्यालगत टीन शेडवर आयशर
> वाहनावरील नियंत्रण सुटून धडक देऊन भीषण अपघात झाला. यात ५ मजूर जागीच
> ठार झाले. तर ८ जण जखमी झाल्याची घटना आज सोमवारी पहाटे ५ वाजेदरम्यान
> वडनेर भोलजी नजिक असलेल्या उड्डाण पुलाजवळ घडली.
>
> राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरून खामगावकडे जाणारे आयशर (क्र. पी बी ११
> सी झेड ४०७४) वाहनाच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून वडनेर भोलजी
> नजीक असलेल्या उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या टीन शेड ला जबर धडक दिली. या
> धडकेत प्रकाश मकु धांडेकर (वय २६ वर्षे), पंकज तुळशीराम जांबेकर (वय १९
> वर्षे), राजाराम दादू जांबेकर (वय ३५ वर्षे), अभिषेक रमेश जांबेकर (वय १८
> वर्षे, सर्व रा. मोरगड ता. चिखलदरा, जि. अमरावती), गुणी भुया भोगर भुवा
> (रा. बोरोमतोली ता. गढ़वा) या पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
>
> तर दीपक पणजी बेलसरे, कमल रमेश जांभेकर, अमर बजू, शाम भास्कर सर्व. रा.
> मोरगड, अक्षय कुमार भैय्या (रा. चिनीया ता. गढ़वा), सतपाल कुमार मलिकचंद
> (रा. बोरी मातोली), महेश मोची (रा. बोरी मातोली जि. गढवा), आशिष कुमार,
> निर्मल भुयार (रा. बोरी मातोली) हे जखमी झालेले आहे. ५ मृत व ८ जखमी
> असे एकुण १३ आहेत. या अपघातातील जखमीवर मलकापूर येथील उपजिल्हा
> रुग्णालयात उपचार सुरू आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.
>
> ========================