जळगाव ( प्रतिनिधी ) – आज सकाळी अजिंठा चौफुलीवरील अचानक उद्भवलेल्या राजकीय कार्यकर्त्यांच्या फलक लावण्याच्या वादात पोलीस कर्मचारयांनी दाखल केलेल्या फिर्यादींनुसार शिवसेना आणि एमआयएम कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .
पो. कॉ मंदार पाटील यांनी एम.आय.डी.सी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की पोलिसांना निनावी फोन आल्यावर आज सकाळी ९.२० वाजता पोउनि निलेश गोसावी, स फौ आनंदसिंग पाटील, पोकॉ श्रीकांत बदर, पोहेकॉ शिवदास नाईक, पोकॉ सिध्देश्वर डापकर, पोकॉ सतिष गर्जे मपोकॉ सपना येरगुंटला हे अजिंठा चौफुलीवर गेले होते . तेथे नविन बनविलेला सर्कलच्या ठिकाणी शिवसेनेचे २० ते २५ कार्यकर्ते व इतर लोकांमध्ये बोर्ड लावण्याचे कारणावरुन वाद सुरु होता .
आधी तेथे स्वातंत्र्य सैनिक मिर शुकूलला सर्कल असा बोर्ड एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी लावला होता . शिवसेनेचे विष्णु भंगाळे , सुनिल महाजन , ललीत कोलहे , ललीत चौधरी , आशुतोष पाटील , मुकुंदा कोळी व इतर २० कार्यकर्ते यांनीदेखिल या नावास विरोध करीत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल सर्कल अशा आशयाचा बोर्ड लावलेला होता त्यास काही लोक विरोध करीत होते आम्ही संबंधित लोकांना समजविण्याचा प्रयत्न केला जिल्हाधिकारी यांचे आदेश होईपावेतो जिलहयात जमावबंदी आदेश लागू आहे असे सांगूनसुध्दा त्यांनी ऐकले नाही
या गैरकायदयाची मंडळी जमवुन शासनाची कोणतीही परवानगी न घेता शासकिय जागेत अतिक्रमण करुन डीजीटल बोर्ड लावुन सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला म्हणुन त्यांच्याविरुद्ध भा.द.वी कलम १४३, १४७, ४४७, १८८, २६९, २७० व साथ रोग अधिनियम २,३,४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
दुसरी फिर्याद सफौ विश्वास बोरसे यांनी दाखल केली आहे . त्यात म्हटले आहे की , निनावी फोन आल्यावर त्यांच्यासह पोउनि अनिस शेख, स फौ अतुल वंजारी , पोकॉ दिपक चौधरी , पाकाँ सचिन पाटील, पोकॉ इम्रान सैय्यद , पोकॉ राजश्री बाविस्कर हे अजिंठा चौफुली येथे गेले होते तेथे एमआयएम कार्यकर्ते नाजीम मिर ( मिर शुक्रुल्ला यांचा पणतु ) , सैय्यद दानीष , शेख अहेमद हुसेन , अँड इम्रान हुसेन , मोहम्मद इम्रान , अब्दुल गणी शेख, रेयान जहागीरदार आदी मुस्लिम कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यसेनानी मिर शुक्रुल्ला सर्कल असा उललेख असलेला पत्री बोर्ड लावलेला दिसला त्यास काही लोक विरोध करीत होते आम्ही या लोकांना समजविण्याचा प्रयत्न केला जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू आहे असे सांगुनदेखिल त्यांनी ऐकले नाही
या फिर्यादीवरून नाजीम मिर , सैय्यद दानीष , शेख अहेमद हुसेन , अँड इम्रान हुसेन , मोहम्मद इम्रान , अब्दुल गणी शेख , रेयान जहागीरदार , शेख शाकीर , आसिफ शेख , फारुख बादलीवाला आदी ३० कार्यकर्त्यांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन गैरकायदयाची मंडळी जमवुन शासनाची परवानगी न घेता शासकिय जागेत अतिक्रमण करुन सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला या आरोपींविरुद्ध भा.द.वी कलम १४३, १४७, ४४७,१८८,२६९,२७० व साथ रोग अधिनियम २,३,४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.