रावेर (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या परिपत्रकात यंदा ‘भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतारदिना’ चा जयंती कार्यक्रमामध्ये नव्याने समावेश केला आहे. या निर्णयाचे महानुभाव साधकांसह मराठी सारस्वतानेही स्वागत केले आहे. महानुभाव साहित्य, आचार्य दिवाकर बाबा पंजाबी खिर्डी व जळगाव जिल्हा महानुभाव परिषदमार्फत जळगाव येथील शिक्षणाधिकारी कार्यालयात गुरुवार, ५ सप्टेंबर २०२४ रोजी भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतारदिन जयंती कार्यक्रम साजरा करण्यासंदर्भात श्री चक्रधर स्वामींची प्रतिमा भेट दिली.
त्यासोबतच गटविकास अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, शाळा महाविद्यालये आदी कार्यलयात या संदर्भात जनजागृती करण्यात आली. यावेळी श्रीकृष्ण मंदिर सस्थानचे मठाधिपति आचार्य चोरमागे बाबा शास्त्री, संघटक मधुकर पुजारी, प्रदीप महाराज, आदींची उपस्थिती होती.
जळगाव जिल्हयातील सम्पूर्ण शाळेला या शासन निर्णयाच्या अनुषंगाने त्यांच्या अधिनस्त असलेल्या सर्व कार्यालयांना चक्रधर स्वामींचा अवतरण दिन साजरा करण्याचे निर्देश द्यावेत, अशीही विनंती करण्यात आली.