एशियन खेळात सुवर्णपदक मिळाल्याबद्दल सन्मान
जळगाव (प्रतिनिधी) : दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या दुसऱ्या एशियन योगासन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक पटकावून भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या डॉ. शरयू जितेंद्र विसपुते (बामणोदकर) यांचा अहिर सुवर्णकार समाज महिला मंडळ, जळगाव यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या गौरव प्रसंगी मंडळाच्या अध्यक्षा रंजनाताई विजय वानखेडे यांनी शरयू यांचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. यावेळी त्यांनी भावनिक शब्दांत मनोगत व्यक्त करत सांगितले, “शरयूच्या यशामुळे संपूर्ण सुवर्णकार समाज आणि विशेषतः महिलावर्गाचा अभिमान वाढला आहे. ती आमच्यासाठी एक प्रेरणास्रोत आहे. तिची ही वाटचाल अशीच यशस्वी होत जावो, हीच सदिच्छा!” सत्कार सोहळ्याला महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्य उपस्थित होत्या.