• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार हे समाजासाठी प्रेरणादायी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 28, 2025
in खान्देश, जळगाव, जैन कंपनी, भारत, महाराष्ट्र
0
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार हे समाजासाठी प्रेरणादायी

जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांचे प्रतिपादन

जळगाव (प्रतिनिधी) :- पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राजवटीत अत्यंत सुशासन, न्यायप्रियता, सामाजिक समता, आणि सर्वसामान्यांच्या हिताचे राज्यकारभार केला. त्यांच्या कार्याची प्रेरणा आजही आधुनिक भारतात आदर्श ठरावी अशी आहे. त्यांच्या विचारातून समाजाला दिशा मिळते, असे मत जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी व्यक्त केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्षानिमित्ताने ३० मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या “३०० किमी – ३०० वाहनांच्या भव्य रॅली” संदर्भात सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांनी अशोकभाऊ जैन यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी अशोकभाऊ जैन बोलत होते. त्यांनी पुढे सांगितले की, “अहिल्यादेवी होळकर यांचे शासनकार्य हे केवळ कारभार नव्हे तर लोकसेवेचे उत्कृष्ट उदाहरण होते. त्यांनी समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या गरजांचा विचार करून विकासाची दिशा ठरवली. रस्ते, धर्मशाळा, घाट, मंदिर, जलव्यवस्था, शिक्षणसंस्था यांचे बांधकाम करून त्या काळातच त्यांनी सर्वसमावेशकतेचे उत्तम उदाहरण घालून दिले. स्त्रीशक्तीचा आदर्श कसा असावा, हे त्यांच्याकडून शिकावे लागेल.”

अहिल्यादेवींचे ज्ञानदान आणि शैक्षणिक दृष्टिकोन आजही प्रेरणादायी आहेत. त्यांनी अनेक तत्त्वज्ञ आणि धर्माचार्यांशी संवाद साधून समाजाला ज्ञानप्रद मार्गदर्शन केले. त्यांनी लोककल्याणार्थ धर्म व अध्यात्माचा उपयोग करून सामाजिक स्थैर्य निर्माण केले. “आजच्या युवा पिढीने अहिल्यादेवींप्रमाणे समाजासाठी झोकून देण्याची प्रेरणा घ्यावी. त्यांच्या राज्यकारभाराची तत्वे म्हणजेच पारदर्शकता, सेवा, कर्तव्यनिष्ठा, आणि न्याय – ही तत्वे जर आपल्याला आत्मसात करता आली, तर खऱ्या अर्थाने आपण त्यांच्या कार्यास अभिवादन करू शकतो,” असेही अशोक जैन यांनी यावेळी सांगितले.

या ऐतिहासिक रॅलीमध्ये शेकडो चारचाकी वाहनांच्या माध्यमातून जिल्ह्यातून प्रेरणादायी यात्रा काढण्यात येणार असून, यामध्ये शहरातील व ग्रामीण भागातील युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्था, आणि राजकीय नेते मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. ही रॅली केवळ एक वाहन यात्रा नसून पुण्यश्लोक अहिल्यादेवींना त्रिशताब्दी वर्षात सामूहिक अभिवादन करण्याचा एक सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक उपक्रम आहे.सदर भेटी प्रसंगी दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख, धनगर समाज महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष करे, मल्हार सेनेचे प्रदेश सरचिटणीस संदीप तेले, धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप धनगर, धनगर समाज कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बागुल, मल्हार सेनेचे विभागीय अध्यक्ष डॉ. संजय पाटील, दिलीप नाझरकर,सचिन धनगर, अश्विन सैंदाणे आदी उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon jain company news #maharashtraपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार हे समाजासाठी प्रेरणादायी
Previous Post

धावते वाळूचे ट्रॅक्टर पलटी झाल्याने तरुण चालकाचा दुर्दैवी मृत्यू !

Next Post

जैन इरिगेशनच्या आधुनिक कृषी उच्चतंत्रज्ञानाचे योगदान अधोरेखित

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जैन इरिगेशनच्या आधुनिक कृषी उच्चतंत्रज्ञानाचे योगदान अधोरेखित

जैन इरिगेशनच्या आधुनिक कृषी उच्चतंत्रज्ञानाचे योगदान अधोरेखित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सावदा हादरले ! १० ते १२ कुत्र्यांचा चिमुरड्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न..!
1xbet russia

सावदा हादरले ! १० ते १२ कुत्र्यांचा चिमुरड्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न..!

April 4, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

जळगावात डंपरच्या धडकेत तरुण जखमी

April 3, 2026
बिलवाडी गावाजवळील  पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

बिलवाडी गावाजवळील  पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 3, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

कंपनीत सुटी मागण्यास गेलेल्या महिलेचा विनयभंग; जिवे मारण्याची धमकी देत अधिकाऱ्याचे अश्लील कृत्य

April 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सावदा हादरले ! १० ते १२ कुत्र्यांचा चिमुरड्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न..!

सावदा हादरले ! १० ते १२ कुत्र्यांचा चिमुरड्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न..!

April 4, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

जळगावात डंपरच्या धडकेत तरुण जखमी

April 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon