जळगाव ;- जळगावसह भुसावळ, अमळनेर या शहरात १४ जुलैपासून नो व्हेईकल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जाहीर केले होते. मात्र आता नागरिकांची गर्दी एकाच मार्गावर अधिक होते आहे. यामुळे ‘नो व्हेईकल झोन’ बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आज काढले आहेत. यामुळे नागरिकांना जळगाव शहरातील विविध भागात मुक्तपणे संचार करता येणार आहे. नागरी जीवन पूर्वपदावर येण्यास यामुळे सुरुवात होणार आहे.

जळगाव महापालिका क्षेत्रासह भुसावळ, अमळनेर या नगरपालिका क्षेत्रात ७ ते १३ जुलै दरम्यान लोकल लॉकडाउनची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाने केली. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. १४ जुलैपासून अनलॉक करण्यात आले. मात्र बाजारपेठेतील गर्दीच्या ठिकाणी ‘नो व्हेईकल झोन’ करण्यात आले. यामुळे प्रत्यक्ष बाजारपेठेत वाहनांची गर्दी कमी झाली. मात्र एकाच मार्गावर वाहनांची गर्दी वाढली. नो व्हेईकल झोनमध्ये पत्रे लावून रस्ते अडविले गेले. नागरिकांनी आपल्या घरी जाताना वाहन नेमके कोठून न्यायचे असा प्रश्न पडत होता, कारण पत्रे पॅक होते. दुसऱ्या लांबच्या अंतराने जाणे पसंत केले. काहींना तर चक्क आम्ही येथील रहिवासी आहोत याचा पुरावा जवळ बाळगावा लागला. नागरिकांनी हा त्रासही सहन केला. केवळ कोरोना संसर्गाची साखळी तुटावी म्हणून. मात्र कोरोनाेची साखळी काही करता तुटत नाही.
तब्बल पंधरा दिवसांनंतर आता नो व्हेईकल झोन’ (ता.२७ पासून) रद्द होणार आहे. यामुळे एकाच मार्गावर होणारी वाहतुकींची कोंडी कमी होईल.
…तर घरी उपचार घेता येणार
कोरोनो बांधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात अनेकांना सौम्य लक्षणे असतात किंवा लक्षण नसतात. मात्र त्यांचा स्वॅब पॉझिटिव्ह येतो. अशा रुग्णांना आता कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड सेंटरमध्ये डेडीकेटेड हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज नाही. त्यांना आता घरीच उपचार घेण्यासाठी परवानगी देता येणार आहे. मात्र जयांचे वय ६० वर्षापेक्षा अधिक आहे व त्यांना विविध व्याधी आहेत. अशांना मात्र घरी उपचारासाठी परवानगी नसेल. घरी उपचार घेणाऱ्यांना स्वतःच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावांचा व संबंधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरच्या शिफारशीसह हमी पत्र द्यावे लागेल. घरी उपचार घेण्यासाठी स्वतंत्र रूम असावी. एकच कुटुंब त्यांच्या घरात राहत असावे. स्वतंत्र बाथरूम, शौचालय असावे. याची खातरजमा तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवकांनी करावी. तसा अहवाल महापालिका क्षेत्रात आयुक्त, तहसीलदार किंवा इंसीडेंट कमांडर यांना सादर करावा.
.







