रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची शक्यता
जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली ते म्हसावद दरम्यान अज्ञात व्यक्तीचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ओळख पटविण्याचे आवाहन केले असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.
म्हसावद येथील स्टेशन प्रबंधकाने दिलेल्या माहितीनुसार शिरसोली ते म्हसावद स्टेशनजवळ एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. त्याला रेल्वेची धडक बसल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. स्टेशन प्रबंधकाने दिलेल्या माहितीवरून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.