अमळनेर ;- आज आदिवासी क्रांतिकारक जन नायक बिरसा मुंडा यांच्या 121 व्या स्मृतिदिनानिमित्त आदिवासी एकता संघर्ष समितीच्या संस्थापक प्रदेशाध्यक्षा प्रा. जयश्री दाभाडे यांनी सर्व शासकीय कार्यालयांना जननायक बिरसा मुंडा यांची प्रतिमा भेट स्वरूपात दिली.
बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंडमधील उलिहातू या गावी १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झाला. तरुण वयात त्यांनी समवयस्क आणि समविचारी सहकार्यांचे संघटन केले.आदिवासींच्या जल जंगल जमीन लढा देणारे बिरसा मुंडा यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी ब्रिटिशांशी आणि मिशनऱ्यांशी लढा दिला. अवघ्या 24 व्या वर्षी त्यांनी आपल्या प्राणाची आहूती दिली.
भारतीय स्वांतत्र्य लढ्यातील क्रांतीकारक आणि आदिवासींच्या हक्कांसाठी लढणारे बिरसा मुंडा यांची आज पुण्यतिथी साजरी केली जात आहे. केवळ 24 व्या वर्षी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या बिरसा मुंडांनी एक वेगळीच छाप उमटवली आहे.
बिरसा मुंडा यांना आदिवासी समाजात आराध्य स्थान प्राप्त आहे. त्यांनी झारखंड, बिहार, छत्तीसगड, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या आदिवासींच्या हक्कांच्या रक्षणासाठी आपले बलिदान दिलं. बिरसा मुंडा यांच्या या योगदानाची दखल घेत भारत सरकारने संसदेत त्यांचे चित्र लावलं आहे. बिरसा मुंडा हे एकमेव आदिवासी नेते आहेत ज्यांचे चित्र संसदेत लावण्यात आलं आहे.
अश्या ह्या महान आदिवासी क्रांतिकारक, जन नायक बिरसा मुंडा या महान नेत्यास मान वंदना म्हणून आज अमळनेर उपविभागीय कार्यालय,अमळनेर तहसिल कार्यालय,अमळनेर नगरपरिषद, अमळनेर पोलीस ठाणे ,अमळनेर उपविभागीय पोलीस कार्यालय ह्या शासकीय कार्यालयात जन नायक बिरसा मुंडा यांची डिजिटल प्रतिमा भेट स्वरूपात आदिवासी एकता संघर्ष समितीच्या प्रा. जयश्री दाभाडे यांच्या संकल्पनेतुन देण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते भरत
पवार,राहुल बडगुजर,अनिल पारधी,विजय साळुंके, उमाकांत ठाकूर,मनोज शिंगाने,पंकज पारधी,विनोद जाधव,मनोज पारधी,पुनमचंद पारधी इ कार्यकर्ते उपस्थित होते.