पाचोरा तालुक्यात पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची गावात कारवाई
पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यात पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी गावातील विठ्ठलपुरा परिसरात दि. २८ सप्टेंबर रोजी मोठी कारवाई करून तब्बल २ लाख ४८ हजार ८३६ किमतीचा महाराष्ट्रात प्रतिबंधित सुगंधित पान मसाला व तंबाखू जप्त केला आहे. ही कारवाई सपोनि कल्याणी वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलिसांनी गायत्री किराणा दुकानाच्या गोडावूनमध्ये छापा टाकला असता, श्रीकृष्ण भगवान क्षिरसागर (वय ४६, रा. पिंपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा) हा प्रतिबंधित गुटखा व तंबाखू विक्रीसाठी साठवून ठेवलेला आढळला.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सपोनि कल्याणी वर्मा, ग्रेपो उपनिरीक्षक प्रकाश पाटील, पोहेकॉ तात्याबा नागरे, पोना पांडुरंग गोरबंजारा यांच्या पथकाने केली. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोउनि विठ्ठल पवार करीत आहेत.