यावल (प्रतिनिधी ) -एक्लाया उसनवारीचे पैसे मागितल्याचा कारणांचा राग येऊन एकास लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना येथे घडली असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, सुरेश मकडू पाटील (वय-५०) रा. आडगाव त्यांनी गावातील योगेश मुरलीधर पाटील याला उसनवारीने पैसे दिले होते. बुधवारी २ फेब्रुवारी रोजी सकाळी सुरेश पाटील यांनी उसनवारीने दिलेले पैसे योगेशकडे मागितले होते. याचा राग योगेशला आल्याने त्याने कुऱ्हाडीच्या दांड्याने सुरेश पाटील यांना बेदम मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांनी यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. याप्रकरणी दुपारी २ वाजता सुरेश पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी योगेश पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप सुर्यवंशी करीत आहे.