एरंडोल (प्रतिनिधी ) – तालुक्यातील आडगाव येथील प्लॉट भागात पाच महिन्याचे मृत अर्भक आढळून आले असून अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ल आडगाव येथील एका प्लॉट भागात मुले खेळत असताना त्यांना ५ महिन्यांचे अर्भक कुणीतरी फेकल्याचे आढळून आल्याने याठिकाणी खळबळ उडाली होती. यावेळी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. गावातील पोलीस पाटील नितीन भुसारी यांनी धाव घेवून माहिती घेतली. पोलीस पाटील भुसारी यांनी कासोदा पोलीस ठाण्यात माहिती दिली. कासोदा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. दरम्यान, गर्भातील साधारण पाच महिन्याचे अर्भक असल्याचे समजते .घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून पोलीस पाटील नितीन भुसारी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात महिलेविरोधात कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ युवराज कोळी करीत आहे.