चाळीसगाव तालुक्यातील देवळीजवळ घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : मुंबईहून भडगावकडे नवरदेवासह येणाऱ्या वऱ्हाडींच्या कारचे टायर फुटले आणि कार समोरून येणाऱ्या दुचाकीवर आदळली. या भीषण अपघातात उंबरखेड येथील एक जण जागीच ठार झाला. ही घटना देवळी ता. चाळीसगावनजीक गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. संबंधित पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.
विनोद पंडितराव पाटील (रा. आदर्शनगर चाळीसगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते ससून डेव्हिड वसतिगृहात व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. मुंबईहून गिरड ता. भडगाव येथे हळदीसाठी जाणाऱ्या नवरदेवाच्या चारचाकी वाहनाचे (क्र. एम.एच. ४२बी.एन. ०२४८) टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार समोरून येणाऱ्या विनोद पाटील यांच्या दुचाकीवर धडकली. धडक इतकी जोरात होती की, दोन्ही वाहनांचा चुराडा झाला. पाटील यांच्या डोक्याला व छातीला जबर मार लागला. त्यांना चाळीसगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दुपारी १२वाजता त्यांचा मृत्यू झाला. घटनेची संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.