वरणगाव;- तालुक्यातील कपिलनगर वस्तीजवळ राष्ट्रीय महामार्गावर लक्झरी बसला अवजड वाहनाने दिलेल्या धडकेत एक प्रवासी जागीच ठार झाला असून सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.
कपिल नगर वस्तीजवळ हवेच्या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे एकेरी वाहतूक सध्या सुरू आहे ते मुंबईहून येणार आहे ट्रॉली व सुरतला जाणारी ट्रॅव्हल्स या दोन वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात मध्यरात्री झाला. या अपघातामध्ये एक जण ठार झाला असून सहा जण गंभीर जखमी झालेआहेत. यातील जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.