धरणगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती जवळची घटना
धरणगाव (प्रतिनिधी) : कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ शेतमजूर महिलांना घेवून जाणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना मंगळवारी दिनांक ३० जुलै रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. यात एक महिला जागीच ठार तर इतर ७ महिला व चालक गंभीर जखमी झालेत. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.
जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. धरणगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळून चारचाकी वाहन शेतमजूर महिलांना शेतात कामासाठी घेवून जात होते. (केसीएन)मंगळवारी दिनांक ३० जुलै रोजी सकाळी ९ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढे रस्त्यावर अचानक कार पलटी झाली. या अपघातात वाहनात बसलेले बसलेले सर्व जण जखमी झाले आहेत.
जखमींना धरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. यातील चंद्रकलाबाई महाजन (वय ५५) यांचा मृत्यू झाला आहे. तर उषाबाई गुलाब महाजन (वय ३५), निताबाई अशोक महाजन (वय ४०), स्वाती शिवाजी वाघ (वय ३४), जिजाबाई लक्ष्मण महाजन (वय-६०), माधुरी दिपक महाजन (वय-३८), सुमन महाजन, ढगूबाई महाजन हे जखमी झाले आहे. दरम्यान अपघात घडल्यानंतर वाहनचालक हा वाहन सोडून पसार झाला आहे.
जखमींना सुरूवातीला धरणगाव ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार घेतल्यानंतर पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत धरणगाव पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.