रावेर तालुक्यातील खिरोदा-पाल घाटात भीषण अपघात
सावदा (अजहर खान) : रावेर तालुक्यातील खिरोदा–पाल घाटात दि. २७ रोजी रात्री ८:३० वाजता भीषण अपघाताने खळबळ उडाली आहे. अज्ञात चारचाकी मालवाहू वाहनाने (एमएच २८ – १३१४)ने दुचाकीला (एमपी ०९ एक्स ७७७९) जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या हृदयद्रावक घटनेत पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला, तर आई आणि तिचा लहान मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
पिंट्या मोहन भिलाला (वय ३५) आणि त्यांचा ४ वर्षांचा चिमुकला रितिका पिंट्या भिलाला, (रा. पाल, ता. रावेर) यांचा या अपघातात करुण अंत झाला. पिंट्या यांची पत्नी पूजा (वय ३०) आणि त्यांचा २ वर्षांचा मुलगा रोशन यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली आहेत. अपघातानंतर चारचाकी वाहनाचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.