भडगाव तालुक्यातील कजगावजवळची घटना
भडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कजगावजवळ दुभाजकाच्या समोरील बाजूस दिशादर्शक फलक नसल्याने सुसाट धावणाऱ्या कार या दुभाजकावर आदळत आहेत. सोमवारच्या रात्री एक कार या दुभाजकावर आदळल्याने वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर कारमधील तीन जणांना मुका मार बसला आहे.
नाशिक येथील बाळासाहेब मंगळकर हे मुलगा दर्शन मंगळकर व त्यांची आई हे तिघेजण नाशिक येथून तळेगाव ता. जामनेर येथे कारने जात होते. जलाराम सॉ मिलजवळ लक्षात न आल्याने कार हि दुभाजकावर आदळली. ही कार फरफटत गेल्याने नुकसान झाले तर त्यात प्रवास करणाऱ्या परिवारास मुका मार लागला आहे. त्यांना नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, अपघातांवर नियंत्रण बसावे अशी अपेक्षा प्रशासनाकडून ग्रामस्थांनी केली आहे.