जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : येथील मध्यवर्ती भागात असलेल्या जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रात्री १० वाजेच्या सुमारास धडक कारवाई करत २ हवालदारांना २० हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदर हवालदारांवर अटकेची व इतर कारवाई सुरू आहे.
जळगाव शहर पोलीस स्टेशन येथे दाखल ४९८ कलममधील गुन्ह्यात सदर हवालदारांनी २० हजार रुपयांची लाच घेतली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सदर हवालदारांची नावे रवींद्र सोनार व धनराज निकुंभ अशी असल्याची समजली आहे. सदर हवालदारांवर अटकेची कार्यवाही सुरू असून पुढील आवश्यक ती कारवाई करण्याचे काम लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांचेकडून करण्यात येत आहे.
पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शहर पोलीस स्टेशनच्या आवारात ही कारवाई केली आहे. दरम्यान या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली असून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगावच्या धडक कामगिरीचे कौतुक होत आहे.