जळगाव (प्रतिनिधी) – येथील महानगरपालिकेने केलेल्या करवाढीविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अभिषेक पाटील यांनी आवाज उठवला आहे. शहरात सर्वात मोठी समस्या खड्ड्यांची आहे. समस्यांचा डोंगर असताना महापालिकेने वाढविलेला कर अयोग्य आहे. यासाठी अभिषेक पाटील यांनी नागरिकांकडून करवाढ विरोधात प्रतिक्रिया मागविल्या आहेत.
जळगाव महापालिका लवकरच करवाढ करणार असल्याचे दिसून येत आहे. महानगरपालिका जळगावकरांना चांगल्या नागरी सुविधा प्रदान करण्यात अपयशी ठरल्यानंतरही प्रशासन विविध करांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या कराला विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मैदानात उतरला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अभिषेक पाटील यांनी या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. त्यांनी ही करवाढ अन्याय्य स्वरूपाची असून शहरवासियांनी प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात असे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे. त्यासाठी त्यांनी ९६९९१६६७९९ हा व्हॉटस अपचा नंबर आणि ईमेलचा पत्ता abhishekpatilncpjalgaoncity@gmail.com हा जाहीर केला आहे.