जळगाव (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणूक संपताच येथील महानगरपालिकेच्या आयुक्तपदी ज्ञानेश्वर ढेरे यांची नियुक्ती राज्यपाल यांचे आदेशाने राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने केली आहे. याबाबत गुरुवारी दि. ६ जून रोजी आदेश पारित झाले आहे.
महानगरपालिकेमध्ये विद्या गायकवाड यांची बदली झाल्यानंतर रिक्त असलेले आयुक्त पद हे पल्लवी भागवत यांच्याकडे प्रभारी म्हणून देण्यात आले होते. लोकसभा निवडणूक असल्याने राज्य शासनाने आता निवडणूक निकाल लागल्यावर आयुक्तपदी नियुक्ती दिली आहे. सांगली येथून जिल्हा प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांना जळगाव महानगरपालिकेचे आयुक्तपद स्वीकारण्याबाबत आदेश देण्यात आला आहे. राज्यपाल यांचे आदेशाने व शासनाच्या उप सचिव प्रियांका कुलकर्णी छापवाले यांच्या सहीने आदेश पारित झाले आहेत.