भुसावळ तालुक्यातील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील जाडगावाजवळील अप लाईनच्यामध्ये पहाटेच्या सुमारास वरणगाव आयुध निर्माणी येथील चोरीस गेलेल्या तीन रायफली आढळून आल्या. रेल्वे पोलिसांना यांची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी वरिष्ठ रेल्वे पोलीसाचे पथक, स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेचे कर्मचारी दाखल झाले होते.

सोमवारी सकाळच्या सुमारास वरणगाव रेल्वे स्टेशन पासून ते भुसावळकडे जाडगाव पर्यंत ट्रॅकमॅन अनिल कुमार हा कर्तव्यावर होता. सकाळी ७ .४५ वाजेच्या सुमारास अप लाईनवर भुसावळकडे जात असताना रेल्वे खांब नं ४५४ / १५ / ते १६ च्या रेल्वे रुळाच्यामध्ये दोन ए. के. ४७ व एक गलील रायफल अशा एकून तीन रायफली त्याच्या दिसून आल्या. त्याने तात्काळ रेल्वे पोलीसांना याची माहिती दिली. रेल्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेचे दाखल झाले आहेत. सदर रायफली आयुध निर्माणीच्या विभागातून दोन गलील रायफली व तीन ए. के. ४७ रायफली चोरी झाल्याचा गुन्हा वरणगाव पोलीस स्टेशनला दि. २३ बुधवार रोजी कनिष्ठ कार्य प्रबंधक प्रदिप कुमार, बाबुराव चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तपास कामी स्थानिक पोलीसासह एटीएस पथक स्थानिक गुन्हे शाखाकडून रायफलीचा कसून तपास करत होते.









