जळगाव ( प्रतिनिधी ) – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (मुलींची) येथे हॅण्ड टुल मशीन, यंत्र सामुग्री, फर्निचर, खुर्ची आदी साहित्य निर्लेखित करण्यात आले आहे. ते विक्रीसाठी उपलब्ध आहे

हे निर्लेखन झालेले साहित्य 30 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर, या कालावधीत संस्थेत सकाळी 9.30 ते संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत बघावयास मिळेल. ज्यांना हे विकत साहित्य घ्यावयाचे आहे त्यांनी वरील वेळेत संस्थेमध्ये (सुट्टीचे दिवस सोडून) येवून निर्लेखन यादीप्रमाणे साहित्य पाहून दरपत्रक भरावे. असे आवाहन प्राचार्या राजश्री पाटील यांनी केले आहे. दरपत्रकाच्या अटी व शर्ती संस्थेत बघावयास मिळतील असेही श्रीमती पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.







