जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील आव्हाणे गावाच्या उपसरपंचपदी राकेश नरेंद्र चौधरी यांची बिनविरोध निवड आज जाहीर करण्यात आली .
ही निवड बिनविरोध व्हावी म्हणून विशेष सहकार्य पॅनल प्रमुख कैलास शिंदे, सरपंच महिलेचे पती भगवान पाटील तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य नवलसिंग पाटील, दिगंबर ढोले, इघण मोरे, भोला पिंजारी, शिवाजी पाटील, ज्ञानेश्वर पाटील, राजू सपकाळे, इमाम पिंजारी, राउफ शेख, विशाल नन्नावरे आदींचे लाभले . बिनविरोध निवड आज जाहीर झाल्यांनतर राकेश नरेंद्र चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.