जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथे २८ वर्षीय तरुणाने कुठल्या तरी नैराश्यात येऊन रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महेंद्र कृष्णा पाटील (वय २८, रा. शिरसोली प्र.न.) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो गावामध्ये त्याच्या आई सोबत राहत होता. त्याच्या वडिलांचे कोरोना महामारीमध्ये निधन झाले आहे. तो अविवाहित होता. त्याच्या बहिणीचे लग्न झालेले आहे. शेतामध्ये शेतमजूर म्हणून महेंद्र काम करीत होता.
गेल्या पाच ते सहा दिवसांपासून तो कामावर जात नव्हता. कुठल्यातरी नैराश्यात आल्यामुळे त्याने शुक्रवारी दि.१३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शिरसोली गावाजवळच्या रेल्वे रुळावर रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. दरम्यान घटनेची वार्ता कळताच आजूबाजूच्या नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली.
त्यानुसार पोलिसांनी महेंद्र पाटील याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी त्यास मयत घोषित केले. दरम्यान महेंद्र पाटील यांच्या मृत्यूची माहिती कळताच त्याच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. महेंद्र पाटील याच्या मृत्यूप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.