डॉ. सुप्रभाजी म. सा. यांचे प्रतिपादन
जळगाव ( प्रतिनिधी ) – ज्याप्रमाणे एखादा उत्सवामध्ये मनुष्याच्या बाह्यभाग रंगतो, त्याप्रमाणे अध्यात्मिक पर्व म्हणजे पर्यषुण पर्व होय. यामध्ये मनुष्याचा आत्मचिंतनातून मोक्षचा मार्ग मिळत असतो. त्यासाठी ‘पर्व’ व ‘त्योहार-उत्सव’ याचा शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. पर्व म्हणजे पवित्रता तर त्योहार म्हणजे दिवाळी, होळी यासह अन्य उत्सव. आवश्यक सुत्रानुसार सामाईक, चोवीसत्व आणि वंदन करावे. चांगल्या गुणांना वंदन केले पाहिजे. विवेक, विनय व समर्पण भावनेतून वंदन केले तर चांगले फळ मिळते. निस्वार्थ वंदन केल्याने आयुष्यमान वाढते, विद्याशील होऊन यशस्वी आणि बलवान होता येते. वंदन केल्याने आत्माला चंतनासारखी शितलता येते, असे डॉ. सुप्रभाजी म.सा. यांनी सांगत महाराणा प्रताप यांची प्रेरक गोष्ट सांगितली.
डॉ. उदीतप्रभाजी म.सा. यांनी शरिरात ‘नाडी’ चे जसे महत्त्व आहे, त्याहीपेक्षा मनुष्याच्या जीवनात ‘नारी’ म्हणजे स्त्री चे महत्त्व खूप मोलाचे आहे. घर, परिवार समाजासाठी ती प्रेरणा शक्ती म्हणून उद्यास येते. महिला म्हणजे म- मधूर स्वभाव व व्यवहार, हि- हिंमत ठेवणारी धैर्यशील असणारी, ला- लाज विवेकनिष्ठेसह संस्कार जोपासणारी असावी. सध्याच्या युगात महिलांनी स्वत:च्या आचरणातून मिळालेल्या स्वातंत्र्याचा वापर पाश्चात्य संस्कृतीच्या आचरणात दिसत आहे. बचत न करणे, आहे त्यात संतुष्टता न मानणे, घरातील कामांना दुर्लक्ष करणे, यासह समाजात प्रिवेडिंग शुटिंग, फॅशनच्या नावावर नको तो पेहराव, विवाह प्रसंगी सार्वजनिक ठिकाणी नृत्य, ब्युटी पार्लरवर मोठा खर्च करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोबाईलच्या आहारी गेल्यामुळे पुढच्या पिढीवर आपण काय संस्कार करत आहोत याचे आत्मचिंतन केले पाहिजे असा त्यांनी दिला.
सुरवातीला डॉ. हेमप्रभाजी म.सा. यांनी अन्तगडदसा सुत्रातील प्रथम अध्ययनातील चतुर्थ व पंचम वर्गाचे भावार्थासह वाचन केले. ज्ञानदर्शनासह आराधनेचा छेद होत नाही त्याला निदानकृत्य म्हटले जाते. ज्यांचे निर्माण झाले आहे, त्याचे निर्वाण होणार हे सत्य आहे. ज्ञान, दर्शन, तप, आराधना करताना फळाची अपेक्षा करु नये. दिक्षा घेण्यासाठी किंवा संत वाणीसाठी ऐकण्यासाठी जे कुणी जात असतील त्यांना प्रोत्साहन देणे सुद्धा आराधना असल्याचे त्यांनी श्रावक-श्राविकांना सांगितले.