जळगाव (प्रतिनिधी) : आंतरशालेय मनपा स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात मुलांमध्ये सेंट जोसेफच्या जयेश सपकाळे याने ६.५ गुणांसह तर मुलींमध्ये पोदार स्कूलची माही संंघवी ७ गुणांसह बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.
जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कांताई सभागृह येथे झालेल्या आंतर शालेय जिल्हास्तरीय सतरा वर्षातील बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाली व संध्याकाळी सात फेऱ्यानंतर नंतर स्पर्धेचा समारोप झाला.
स्पर्धेत एकूण १७ वर्षे वयोगटात मुलांमध्ये एकूण १०३ तर मुलींमध्ये ४७ खेळाडूंचा सहभाग होता.
या स्पर्धेत प्रथम पाच क्रमांक स्पर्धेत प्रथम ५ आलेल्या मुलं आणि मुलींना जैन स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे पदक देण्यात आली तसेच या प्रथम पाच व मुलं आणि मुलींची निवड विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी करण्यात आली
विजय खेळाडूंना पारितोषिक देण्यासाठी जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव श्री नंदलाल गादिया सहसचिव संजय पाटील जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे रवींद्र धर्माधिकारी प्रवीण ठाकरे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली.
स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून प्रवीण ठाकरे,संजय पाटील, आकाश धनगर प्रशांत पाटील होते.
१७ वर्षाखालील विजयी मुले
जयेश विजय सपकाळे(सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल)
हर्षवर्धन महेंद्र बडे (ओरिअन इंग्लिश मिडीयम स्कूल)
भाग्येश ज्ञानेश्वर पाटील (सेंट टेरेसा स्कूल जळगांव)
कार्तिक संजय कासार (भगीरथ इंग्लिश मिडीयम स्कूल)
रुपेश सुरेंद्र चौधरी (सेंट टेरेसा स्कूल )
१७ वर्षाखालील मुली
माही पंकज संघवी (पोदार स्कूल)
अक्षदा चंद्रकांत परदेशी(सेंट लॉरेन्स स्कूल)
दिशा विरेंद्रकुमार चांडक(प.न.लुकड कन्या स्कूल)
अनुष्का शमिका सिंह( सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल)
जान्हवी प्रदिप सोनवणे(अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल