जळगाव ( प्रतिनिधी ) — आसोदा येथील ३६ वर्षीय शेतकऱ्याने दारूच्या नशेत राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील आसोदा येथील रहिवाशी शेतकरी रमेश अशोक पाटील (वय – ३६) दोन भाऊ , पत्नी व दोन मुलीसह राहतात. शेती करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. २३ सप्टेंबररोजी त्यांची पत्नी शेतात होत्या. दोन्ही मुली कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. सायंकाळी रमेश पाटील यांनी राहत्या घरातील पुढच्या खोलीत दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांची पत्नी सायंकाळी शेतातून घरी आल्या त्यावेळी रमेश पाटील यांनीं आत्महत्या केल्याचे उघडकीस आले . त्यांचा मृतदेह खाली उतरवून तातडीने जिल्हा रूग्णालयाने नेण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. निता भोळे यांनी त्यांना मयत घोषीत केले. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो ना किरण आगोणे करीत आहे.







