जळगाव तालुक्यात असोदा-भादली रेल्वे रुळावरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील आसोदा भादली शिवारात धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने ३५ वर्षीय तरूणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भागवत सोपान धनगर (वय-३५, रा.नशिराबाद ता.जळगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे. तालुक्यातील नशिराबाद येथील भागवत सोपान धनगर हे कुटूंबीयांसह वास्तव्यास होते. मंगळवारी ५ नोव्हेंबर रोजी दुपारी कामानिमीत्त ते घराबाहेर पडले होते. नशिराबाद गावापासून काही अंतरावर आसोदा-भादली शिवारात धावत्या रेल्वे समोर आल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना दुपारी ३ वाजता समोर आली.
या घटनेची माहिती रेल्वे मोटरमनद्वारे जळगावस्थानकावर कळवण्यात आल्यानंतर तालूका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस नाईक सुधाकर शिंदे यांनी मृतदेहाचा पंचनामा करुन जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मयताच्या खिश्यात मिळून आलेल्या साहित्यावरुन त्यांची ओळख पटवण्यात आली असून कुटूंबीयांना पोलिसांनी माहिती दिल्यावर नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. जळगाव तालूका पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक सुधाकर शिंदे करत आहेत.