जळगाव ( प्रतिनिधी ) – आसोदा रोड मोहन टॉकीजवळ महिलेची २५ हजार रूपयांची मंगलपोत अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छाया रतन बाविस्कर (वय-३८) या . मोहन टॉकीजवळ कुटुंबियासह वास्तव्याला आहे. गुरूवारी रोजी दुपारी छाया बाविस्कर घराच्या ओट्यावर बसलेल्या होत्या. त्यावेळी अंदाजे ४० वर्षीय अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आला. तुमच्या घरात दोष असल्याचे सांगून घराच्या अंगणात पुजेच्या ठिकाणी सोन्याची पोत व कानातले बाही ठेवले होते. महिला घरात चहापाणी करण्यासाठी गेल्या असता पुजेसाठी ठेवलेले मंगलपोत आणि सोन्याची बाही असा २५ हजार रूपयांचा मुद्देमाल अनोळखी व्यक्तीने चोरून पसार झाला. महिलेने शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुरूवारी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रघुनाथ महाजन करीत आहेत .