सांस्कृतिक कला निकेतनचा स्तुत्य उपक्रम
भुसावळ (प्रतिनिधी) – आषाढी एकादशी निमित्त गुरूवार दिनांक २९ जून रोजी सांस्कृतिक कला निकेतन तर्फे पंढरीचे वारकरी, आम्ही टाळकरी कार्यक्रम उत्साहात पार पडला. यात शहरातील विविध भागातील साधारणत १५० महिलांनी सहभागी होऊन विठ्ठला प्रती भक्ती सादर केली. यावेळी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.
सांस्कृतिक कला निकेतन, भुसावळ तर्फे गुरूवार रोजी सायंकाळी तापी नगर येथील श्री सप्तशृंगी माता मंदिर परिसरात पंढरीचे वारकरी, आम्ही टाळकरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचे हे पहिलेच वर्ष आहे. याप्रसंगी आमदार संजय सावकारे, प्रतिष्ठा महिला मंडळ अध्यक्षा रजनी सावकारे, ताप्ती एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष मोहन फालक, सौ स्मिता फालक, डॉ उल्हास पाटील सी बी ऐस ई स्कूल भुसावळ मुख्याध्यापिका अनघा पाटील, सप्तशुंगी मंदिर ट्रस्ट भुसावळ चे अध्यक्ष डॉ जे के भिरूड हे उपस्थीत होते. याप्रसंगी समूह नृत्याद्वारे विठ्ठलाची भक्ती करण्यात आली. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व त्याकरिता गेल्या एक महिन्यापासून महिला वर्गाकडून सराव करून घेण्यात आला. या करिता सांस्कृतीक कला निकेतन प्रमुख मुकेश खपली यांच्या सह शंभू गोडबोले, मधुकर गोडबोले, सुनिल पाटील, यश इंगळे, सागरजोशी, रवि वाघ, गौरी पांडव, कोमल चव्हाण, डॉ.भाग्यश्री भंगाळे, शालिनी वाडेकर, महानंदाताई पाटील, प्रियंका चौधरी, ज्योती शितोळे, मनिषा ताडेकर आदिंनी परिश्रम घेतले.