एमआयडीसी पोलिसांची २४ तासांत कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील शिरसोली नाका येथे बांधकाम साहित्य चोरून नेणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यावर अवघ्या २४ तासांत संशयित आरोपी निष्पन्न करून एमआयडीसी पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली असून बांधकाम साहित्य संशयितांकडून चोरी केलेले साहित्य विकत घेणाऱ्या भंगार व्यावसायिकाला देखील अटक केली आहे.
जळगाव शहरातील पुरुषोत्तम नगर शिरसोली नाका येथे तसेच दि. २१ रोजी रात्रीचे वेळी अजय ओमप्रकाश जोशी यांचे चालु असलेल्या बांधकामाचे साईटवरुन कोणीतरी अज्ञात इसमाने २९ हजार रुपये किंमतीची आसारी, लॉखडी सेंट्रींग प्लेटा, बांधकामाचे साहीत्य चोरी केले होते. म्हणून अजय जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरची चोरी ही शेख फैयाज शेख शमसोद्दीन (वय ३६ वर्ष रा, फुकटपुरा तांबापुर) याने केल्याबाबतची माहीती पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली होती. त्यप्रमाणे त्यास ताब्यात घेण्यात आले होते व त्यास अटक करुन त्याची पोलीस कस्टडी रीमांड प्राप्त केला होता.
त्याने सदरचा माल हा भंगार व्यावसायीक शेख रहीम शेख खलील (वय २४ रा, बॉम्बे बेकरीजवळ, मलीक नगर जळगाव) याला विकले असल्याबाबतची माहीती सांगीतल्याने त्याला सुध्दा ताब्यात घेवुन अटक करण्यात आली. त्यांना शुक्रवारी दि. २३ रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायमुर्ती व्ही एम देशमुख यांनी कोठडी दिली आहे. सदरची कारवाई ही उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी आसाराम मनोरे, पोउनी दत्तात्रय पोटे, पोउनी दिपक जगदाळे, सफौ अतुल वंजारी, पोहेका. रामकृष्ण पाटील, प्रदीप पाटील, स्वप्नील पाटील, पोना. सचीन पाटील, योगेश बारी, राहुल रगडे, विशाल कोळी, मनोज पाटील, महीला अंमलदार राजश्री बावीस्कर यांनी केली आहे.