जळगाव ( प्रतिनिधी ) – पोलीस महानिरीक्षक यांच्या विशेष पथकाने चोपडा ग्रामीण पोलिसांच्या मदतीने सयुक्त कारवाई करीत काल गावठी कट्ट्यासह आरोपी पकडला.
काल पोलीस महानिरीक्षक यांच्या विशेष पथकाने चोपडा ग्रामीण पोलिसांच्या मदतीने सयुक्त कारवाई. केली या पथकात स पो नि बशिर तडवी , हे कॉ
रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने, राकेश पाटील, रितेश चौधरी यांचा समावेश होता या पथकाने गावठी कट्टा धाडीत सापडलेला आरोपी श्रावनसिह छोटु राजपुत ( वय 21,रा.भुरजगड ता.जि.जैसलमेर पलसवड , राजस्थान) याला अटक केली . त्याने हा कट्टा कुणाकडून घेतला याच्या तपासासाठी त्याची चौकशी सुरु आहे त्याच्या विरोधात चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरन 11 /2022 आर्म अँक्ट कलम ३/ २५, ७/ २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या आरोपीच्या ताब्यातून २५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व २ हजार रुपये किंमतीचे दोन राऊन्ड 2000 जप्त करण्यात आले .आरोपीला चोपडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे .