जळगाव एलसीबीची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात विविध घरफोडीच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तपास करीत असतांना त्यांनी एकाला अडावद येथून ताब्यात घेत अटक केली होती. त्याने रावेर तालुक्यातील सावदा येथे किराणा दुकान व चोपडा शहरात हॉटेलमध्ये साथीदारांसह चोरी केल्याचे निष्पन्न झाले होते. या गुन्ह्यातील २ साथीदारांना स्थानिक गुन्हे शाखेने सुरत येथून अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक किसन नजन पाटील यांनी घरफोडीच्या गुन्ह्याबाबत पथक रवाना केले होते. त्यात अडावद शहरात राहणार संशयित अक्षय संजय कोळी (वय २१, रा. इंदिरा नगर, अडावद ह. मु. धानोरा रोड, अडावद ता. चोपडा) याला ताब्यात घेऊन अटक केली होती. त्याने त्याच्या साथीदारासह सावदा-फैजपूर रोडवर किराणा दुकानात आणि चोपडा शहरातील कारगिल चौकातील हॉटेल भाऊ येथे चोरी केल्याची कबुली दिली आहे. संशयित अक्षय कोळी याला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी सावदा पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले आहे.
सदर गुन्ह्यात मुख्य संशयित आरोपी शांताराम उर्फ शान्या प्रताप कोळी (रा. हातेड ता. चोपडा) व सचिन उर्फ भैय्या रामदास देवरे (वय ३१, रा. सुरत) या दोघांना सुरत येथून एलसीबीने अटक करीत सावदा पोलीस स्टेशनला जमा केले आहे. तपास पथकात पोहेकॉ संदीप पाटील, प्रविण मांडोळे, कमलाकर बागुल, गोरखनाथ बागुल, महेश सोमवंशी आदींचा समावेश होता.