ग्राहकांची प्रतिक्रिया : गुणवत्ता आणि विश्वासाची परंपरा
जळगाव (वाणिज्य प्रतिनिधी) :- गुणवत्ता आणि विश्वासाची परंपरा जपणाऱ्या आर. जी. ज्वेलर्सतर्फे दि. २४ ऑगस्ट रोजी लकी ड्रॉ शहरातील नवीपेठ भागातील आर.जी. ज्वेलर्स दालनासमोर हा लकी ड्रॉ काढण्यात आला. यावेळी अनेक ग्राहकांना या लकी ड्रॉ योजनेतून बक्षिसे मिळाली.
यावेळी व्यासपीठावर जेष्ठ पत्रकार चंद्रशेखर जोशी, ज्येष्ठ पत्रकार मनोज बारी, आनंद शर्मा, पोलीस निरीक्षक सागर शिंपी. विश्व हिंदू परिषदेचे शहराध्यक्ष हरिश मुंदडा, उद्योजक राजेश मुंदडा, रामजी सूर्यवंशी उपस्थित होते. प्रास्ताविकात आर.जी. ज्वेलर्सचे संचालक रामदयाल सोनी यांनी, सुवर्ण व्यवसायातील त्यांचा प्रवास सांगत जळगावातील प्रतिष्ठीत अशा सुवर्ण पेढ्यांमध्ये काम केले. या दरम्यान राजस्थानी, बंगाली, मराठी कारागिरांसोबत काम केले. सोन्याचे दागिने बनवण्याचा मोठा अनुभव पाठिशी असल्याने आर.जी. ज्वेलर्सच्या रुपाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. माझ्यासह मुलगा धर्मेंद्र सोनी, घमंडीराम सोनी, भगवती सोनी आणि संपूर्ण परिवार परिश्रम घेत आहोत. या ठिकाणी आम्ही स्वतः सोन्याचे दागिने घडवितो. आम्हाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे आणि त्याचीच जाण राखत आम्ही ही लकी ड्रॉ योजना सुरू केली आहे, असे सांगितले, तर मान्यवरांनी या योजनेचे कौतुक करत आर. जी. ज्वेलर्सला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
लकी ड्रॉ योजनेत यांना मिळाली बक्षिसे
रुपाली राणे (टी.व्ही विजेत्या), ललित पाटील (मिक्सर), शारदा सोनवणे (रोटी मेकर), कौशल जगदाडे (हॅण्ड मिक्सर), शारदा गायकवाड, रुपाली सोनगिरे, रेणुका पानवर्स, आरती सोनी माहेश्वरी, दिलीप पोळ, कविता सोनवणे, वर्षा मारू, पुष्पा छाजेड, दीपक सोनगिरे, सुनीता वाणी (चांदीची हनुमान चालिसा आणि स्फटीक माळ), मनीषा पाटील, अर्चना पाटील, पद्मा बोरा, रुपाली राणे, कौशल पलोड, महेश सोनगिरे, मोना नहाटा, गंगाधर गायकवाड, रत्ना अमृतकर, प्रथमेश सपकाळे (ब्ल्यू टूथ), विकास शिंपि, किरण सोनगिरे, नूतन पाटील, धनराज बारी, प्रियंका राठी, विवेक धांडे, रोहीत शिंपी, वैशाली वाणी, नकूल बारी फुसे, पद्मा सुर्वे (सित्वर फ्रेम विजेते). कोमल इंगळ, रहेमान, स्वाती तायडे, सुशीला दायमा, संस्कृती नेवे (गेम शो विजेते). सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी केले.