अपघातासह इमर्जन्सी सेवेसाठी २४ तास सज्ज
जळगाव (प्रतिनिधी):- येथील आकाशवाणी चौकातील महादेव हॉस्पिटल येथे अपघातातील व इतर इमर्जन्सी रुग्णांसाठी कार्यरत आपत्कालीन कक्षामुळे अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचण्यात वैद्यकीय पथकांना यश मिळाले आहे.
शहरात मध्यवर्ती भागात असलेल्या आकाशवाणी चौकात महादेव हॉस्पिटल आहे. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या या रुग्णालयात अपघातातील जखमी रुग्णांसाठी आवश्यक अस्थिरोग, शल्यचिकित्सा, मेडिसिन, कान-नाक-घसा, नेत्ररोग असे विविध विभागाची सेवा २४ तास उपलब्ध आहेत. तसेच, सुपरस्पेशालिटी न्यूरॉलॉजी विभाग, सुपरस्पेशलिटी कार्डिओलॉजी विभाग, युरॉलॉजी विभाग अशा महत्वाच्या विभागातील नामांकित तज्ज्ञ डॉक्टर्सदेखील अपघातग्रस्त रुग्णांसाठी २४ तास सेवेत आहेत.
मागील महिन्यात १७५ पेक्षा अधिक रुग्णांना विविध विभागाच्या वैद्यकीय पथकाकडून आपत्कालीन विभागात तातडीने उपचार करून दिलासा देण्यात आला. यात काही गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार मिळाल्यामुळे त्यांचा जीव वाचण्यात डॉक्टरांना यश मिळाले. जर आपत्कालीन घटना घडली तर नागरिकांनी सर्व सुविधायुक्त असलेल्या आकाशवाणी चौकात महादेव हॉस्पिटल येथे उपचारासाठी यावे, असे आवाहन रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी (९३२५१५ ०००४, ९५८८४ ७६५९६) यांच्याशी संपर्क साधावा.









