जळगाव शहरात सिंधी कॉलनीजवळ घडली होती घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील कलाभवनाजवळ जात असताना भरधाव दुचाकी पोलीसांचे बॅरिकेटस् घेवून जाणाऱ्या वाहनावर आदळली होती. या अपघातात दोन्ही भाऊ गंभीररित्या जखमी झाले होते. यातील एका तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ईश्वरसिंग मेहेरसिंग टाक (वय-३५, रा. सदगुरू नगर, जळगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे. शहरातील सिंधी कॉलनीजवळ कला भवनाजवळून ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास पोलिस दलाचे वाहन (क्र. एमएच १९, एम ९२१४) हे सिंधी कॉलनीकडून पांडे डेअरी चौकाकडे जात होते. त्यावेळी ईश्वरसिंग मेहेरसिंग टाक (वय -३५) व त्यांचा भाऊ नेपालसिंद मिहेरसिंग टाक (वय-३६) हे दोघे भाऊ दुचाकी क्रमांक (क्र एमएच १९, टी ६८१८) ने सिंधी कॉलनीकडे जात असतांना त्यांची दुचाकी पोलीसांच्या वाहनावर धडकली. या अपघतात दोन्ही भाऊ गंभीर जखमी झाले. दोघांना खासगी रूग्णालयात दाखल केले होते. यातील गंभीर जखमी झालेल्या ईश्वरसिंग मेहेरसिंग टाक याचा सोमवारी ९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.